गन एक्सपर्ट काशिनाथ देवधर यांना ‘तेजपर्व’ दिनदर्शिका भेट

    दिनांक :15-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Kashinath Deodhar भारतीय संरक्षण विभागात प्रकल्प अधिकारी, विभागीय प्रमुख इत्यादी पदावरून निवृत्त झालेले गन एक्सपर्ट काशिनाथ देवधर यांना स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांवरील दिनदर्शिका ‘तेजपर्व’ भेट देण्यात आली.
 

Kashinath Deodhar 
 
शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी 40 वर्षे सेवा दिल्यानंतर भारताची संरक्षण सिद्धतेवर 1 हजारच्या वर देशभरात भाषणे दिली. विज्ञान भारतीचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख काशिनाथ देवधर 11 व 12 डिसेंबर रोजी यवतमाळात शिशुविहार मंडळ संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आले होते. Kashinath Deodhar त्यावेळी हिंदू महासभेचे लक्ष्मणलाल खत्री यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ‘तेजपर्व’ दिनदर्शिका 2024 सस्नेह भेट दिली. यावेळी जिल्हा ब्राह्मण सभेचे अध्यक्ष संजय जोशी, प्रांत कार्यवाह किशोर पाठक, रवींद्र देशपांडे, शिशुविहार मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत देशपांडे, सचिव डॉ. श्रीधर देशपांडे, डॉ. योगेश मारू उपस्थित होते.