- नरेंद्र सुरकार
सिंदीरेल्वे,
Sindi railway taluka : महाराष्ट्रात लवकरच अनेक नवे तालुके निर्माण करू असे सहा वर्षांपूर्वी सरकारने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने सिंदी रेल्वे तालुका व्हावा या करिता तीन आमदारांनी वेळोवेळी सकारात्मक भूमिका मांडली होती. परंतु, अद्याप सिंदीरेल्वे तहसील निर्माण झाली नाही. जनतेच्या आशा आकांक्षांचा चुराडा झाल्याची भावना बळावत आहे, एवढे नक्की!
सिंदीरेल्वे Sindi railway taluka आणि पुलगाव तालुका करू असे प्रचारादरम्यान आश्वासन दिले होते. मात्र, या तालुक्यांची रितसर घोषणा अद्याप झाली नाही. तीन दशकांपूर्वी तत्कालीन आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी सिंदीरेल्वे तालुक्याचा प्रस्ताव राज्य सरकारला 2007 मध्ये सादर केला होता. या तालुक्यात 79 गावांचा समावेश होणार, असे त्या प्रस्तावात नमूद होते. अशोक शिंदे व समीर कुणावार यांनीही सन 2013 आणि 2017 मध्ये सिंदी तालुका करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे कबूल केले होते. परंतु, सहा वर्षांपेक्षा जादा काळ झाला तरी राज्य सरकारने त्या संदर्भात कोणतेच पाऊल उचलले नाही!
वर्धा लोकसभा मतदार संघातील या नगरीचा समावेश हल्ली हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात करण्यात आला आहे. परंतु, महसूल विभागातील नोंदीनुसार या भागाची तहसील मात्र सेलू आहे. परिणामी, या Sindi railway taluka भागातील विकास कामांचा खेळखंडोबा होत आहे, हे विशेष. नव्याने तालुक्यांची पुनर्रचना करताना सिंदीरेल्वे तालुका निर्माण करुन महायुती सरकारने वचनपूर्ती करावी, अशी जनभावना बळावत आहे.