श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ

    दिनांक :16-Dec-2023
Total Views |
कोलंबो, 
Sri Lankan economy अलिकडच्या काळात आर्थिक संकट ओढवल्यानंतर श्रीलंकेतील अर्थव्यवस्थेत Sri Lankan economy प्रथमच सकारात्मक वाढ नोंदवली आहे, अशी अधिकृत आकडेवारी आहे.
 

Sri Lankan economy 
 
तिसऱ्या तिमाहीत वार्षिक जीडीपी वाढीचा दर सकारात्मक विकास दराच्या १.६ टक्के नोंदवला गेला आहे, असे जनगणना आणि सांख्यिकी विभागाने (डीसीएस) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. Sri Lankan economy श्रीलंकेने एप्रिल २०२२ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली, तेव्हा उणे ८ टक्के वाढ नोंदवली होती. २०२१ च्या चौथ्या तिमाहीपासून देशाची अर्थव्यवस्था नकारात्मक स्थितीत राहिली. २०२३ सालासाठी श्रीलंकेची एकूण वाढ नकारात्मक राहील. तथापि, २०२४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था सकारात्मक एक अधिक वाढीसह वाढण्याची अपेक्षा आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. आयएमएफने या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या २.९ अब्ज अमेरिकन डॉलर्स बेलआऊटचा दुसरा टप्पा जारी केला. Sri Lankan economy श्रीलंका सध्या आयएमएफ आधारित कठोर आर्थिक सुधारणा पद्धतीतून जात आहे. विरोधकांकडून जोरदार टीका होत असतानाही राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आर्थिक सुधारणांवर आग्रही आहेत. विक्रमसिंघे हे अर्थमंत्री सुद्धा आहेत.