पंधरा दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसामुळे damage Crop harbhara हरभरा पिकाचे 90 टक्के नुकसान झाले आहे. पेरलेली पिके जसे व्हापसा होत चालला, तसतशी वाळत असून जळ आणि मरीचे प्रमाण वाढत असल्याचे विदारक चित्र असल्यामुळे सर्व शेतकरी वर्गास दुबार पेरणीस सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येक शेता-शेतात हरभरा पीक मोडल्या जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेला शेतकरी नाईलाजाने 80 ते 90 रुपये दराने बियाणे विकत आणून पेरताना दिसत आहे. तर दोन-पाच टक्के हिरवी रोपे आहेत. त्याबद्दल शेतकरी वर्गात चर्चा असून वाचलेली रोपे वांझोटी होतात. त्याला कशाही प्रकारची फळधारणा होत नाही.
damage Crop harbhara : अशाही उलटसुलट चर्चेला उधाण येत असून संभ‘मात असलेले काही शेतकरी वर्ग जात्यात आणि सुपात अडकलेल्या मनःस्थितीत असल्यामुळे बहुतांशी चांगल्या शेतांवरही नांगर फिरवल्या जात आहे. सोयाबीनने दगा दिला तरी आंतरपीक तुरीचे घेतल्याने शेतकर्यांसाठी पावसापूर्वी तूर दिलासादायक होती. पिवळं नेसून आलेल्या बहारदार शेतांनी रान फुलवले होते आणि जीवही जागेवर आला होता. परंतु ‘बिन बुलाये मेहमान’ आगंतुक पावसाने थेंबांऐवजी काळ्या आणि हिरव्या अळ्यांचाच पाऊस पाडला. त्यांनी फुल, मोहर, चाफी, तर फस्तच केली, तुरीला पानसुद्धा ठेवले नाही. तुरीचे वरण दूरच असून आमटीसाठी शेंगाही नाहीत.