नागपूर,
Maharaj Bagh Zoo : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात गेल्या वर्षी 88 प्राणी होते. सध्या 74 प्राणी असून वर्षभरात 6 प्राण्यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी 7 प्राणी मृत पावले होते. गेल्या वर्षभरात 23 प्राण्यांचा मृत्यू झाला असून ही आकडेवारी सप्टेंबर महिन्यातील आहे. मुख्यत: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने महाराजबागेतील 18 काळवीट, 4 चितळ, 1हॉग डियरचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सु. श्री. बावस्कर यांनी माहिती अधिकार अंतर्गत अभय कोलारकर यांना दिली आहे.
5 वर्षात 3 कोटी 37 लाख रुपयांचा खर्च
कृषी विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या Maharaj Bagh Zoo महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या खाण्यावर दरवर्षी 81 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. 2019-20 मध्ये 48 लाख 93,313, 2020-21 मध्ये 80 लाख 37 हजार 676 तर 2021-22 मध्ये 81लाख 60 हजार 049 आणि 2022-23 मध्ये 80 लाख 96 हजार 355 तर 1एप्रिल ते 31 ऑक्टोबर पर्यंत 45 लाख 63 हजार 753 रुपयांचा खर्च झाला आहे. गत 5 वर्षात 3 कोटी 37 लाख 51 हजार 146 रुपयांचा खर्च झाला आहे.