काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भय्यासाहेब देशमुख यांचे निधन

17 Dec 2023 20:48:36
बाभुळगाव,
Bhaiyasaheb Deshmukh : बाभुळगाव तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रयोगशील शेतकरी पंजाबराव वामनराव देशमुख यांचे रविवार, 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी त्यांच्या घरीच तीव‘ हृदयाघाताने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुले मुकेश व रंजित, मुलगी ज्योती उदय देशमुख आणि भला मोठा कार्यकर्त्यांचा संच आहे.
 
Bhaiyasaheb Deshmukh
 
‘भय्यासाहेब देशमुख’ Bhaiyasaheb Deshmukh या नावाने जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यांच्या मूळ गावची, शिंदी ग्रामपंचायत स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजही त्यांच्या ताब्यात आहे. सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे देशमुख पुढे ग्रामविविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, बाभुळगाव पंचायत समितीचे पाहिले उपसभापती, बाभुळगाव खरेदी विक्री संघाचे 10 वर्षे अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, सत्यसाईबाबा बँकेचे संचालक, देवगाव साखर कारखान्याचे संचालक आणि मदर टेरेसा शिक्षण संस्थेचे संचालक होते.
 
 
कै. भय्यासाहेब देशमुख Bhaiyasaheb Deshmukh यांना त्यांच्या शेतात माती देण्यात आली. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक घारफळकर, डॉ. रमेश महानूर, अशोक बोबडे व सर्व स्तरातील शेकडो चाहते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0