डॉ. विश्वनाथ कराड यांना ‘ऑनररी डिस्टींगविश फेलो’ सन्मान

18 Dec 2023 17:48:11
वाशीम, 
Dr. Vishwanath Karad : महाराष्ट्र अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स तर्फे विश्वशांतीसाठी जीवन समर्पित करणारे विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘ऑनररी डिस्टींगविश फेलो’ हा सन्मान शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी. डी.यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात महाराष्ट्र अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स तर्फे आयोजित प्रा. एम.आर. भिडे मेमोरियल लेचर या कार्यक्रमात Dr. Vishwanath Karad डॉ. विश्वनाथ कराड यांचा सन्मान करण्यात आला.
 
adwd
 
यावेळी घोषणा करण्यात आली की महाराष्ट्र अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स आणि एमआयटी हे दोघेही मिळून कार्य करणार आहेत. तसेच डॉ. विश्वनाथ कराड Dr. Vishwanath Karad यांना महाराष्ट्र सायन्सेस कॉग्रेसचे पॅटर्न म्हणून घोषीत केले. या संदर्भात शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. यादव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपूर येथे चर्चा केली. त्यानुसार महाराष्ट्र सायन्सेस कॉग्रेस नोव्हेंबर २०२४ला पुण्यात होणार आहे. आयोजित कार्यक्रमाच्या वेळी मंचावर पद्मश्री डॉ.जी.डी.यादव, डॉ. राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी चे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डब्ल्यूपीयूच्या सेंटर ऑफ एसलेन्स मटेरियल सायन्यचे डायरेटर डॉ. भरत काळे हे उपस्थित होते.
 
 
सत्काराल उत्तर देतांना डॉ. विश्वनाथ दा. कराड Dr. Vishwanath Karad म्हणाले,शिक्षण म्हणजे सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग. हाच धागा पकडून विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण येथे दिले जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या नावाने राजबाग येथे उभारण्यात आलेल्या डोम मधून विश्वशांतीचे कार्य सुरू आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म हे सर्वात महत्वाचे आहे. शास्त्रज्ञ डॉ. जयंत खंदारे व एमआयटी चे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी विचार व्यक्त केले. डॉ. भरत काळे यांनी स्वागत पर भाषण केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौतम बापट व आभार डॉ. राधाकृष्णन यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0