कोण आहे सलीम कुत्ता ? विधिमंडळ कामकाजात उल्लेख-चर्चा ! (बघा व्हिडीओ)

18 Dec 2023 13:32:02
मुंबई,
 
Who is Salim Kutta शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सलीम कुत्ताचा सोबत नाचतानाचा व्हिडीओ नागपूर हिवाळी अधिवेशनात दाखवला. भाजपचे आमदार नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी सभागृहात हा व्हिडीओ दाखवला होता. Who is Salim Kutta सलीम कुट्टा उर्फ मोहम्मद सलीम मीरा शेख, ज्याला 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विरोधी टोळ्यांवर निर्दयपणे आणि अमानुष हल्ला करण्याच्या क्रूर वृत्तीमुळे त्याला अंडरवर्ल्डमध्ये सलीम कुत्ता नावाने ओळखले जात असे. Who is Salim Kutta
 
Who is Salim Kutta
 
मोहम्मद सलीम मीरा शेख हा मूळचा तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कुट्टा या गावचा आहे. तो मुंबईत जन्मला आणि वाढला. त्याने बॉम्बे येथील सेंट इग्नेशियस स्कूलमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. Who is Salim Kutta वयाच्या 15 व्या वर्षी त्याने शाळा सोडली. पायधोनी, पलटन रोड, भायखळा आणि कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याचे दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्यांशी भांडण झाले होते.Who is Salim Kutta त्याने खटल्याच्या सुनावणीदरम्यान नियुक्त टाडा न्यायालयाला कुट्टा म्हणजे हिंदीत कुत्रा असा अर्थ होत असल्याने न्यायालयाच्या नोंदीतून तो शब्द वगळण्याची विनंती केली होती. ही बातमीदेखील वाचा ...अचलपूरमध्ये शिक्षकाच्या घरावर एनआयएचा छापा
 
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सलीम मीरा शेख उर्फ ​​सलीम कुट्टा हा सध्या पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अंडा सेलमध्ये असून 2016 पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. Who is Salim Kutta तेव्हापासून त्याला पॅरोलवर पाठवण्यात आले नाही. गेल्या काही वर्षांत तो कधीच पॅरोलवर आला नव्हता. यापूर्वी तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात होता. त्यावेळी तो पॅरोलवर गेला असावा. त्याच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 2016 च्या अगोदरचा व्हिडीओ असावा. Who is Salim Kutta वर्ष 1990 मध्ये त्याची आई आजारी पडली होती आणि तिला चर्नी रोड येथील सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सलीमला पैशांची गरज होती आणि पोलीसही त्याच्या मागावर होते. Who is Salim Kutta त्याची पैशांची गरज नखुदा मोहल्ला येथील मुस्तफा डोसा उर्फ मुस्तफा मजनूने पूर्ण केली आणि तेव्हापासूनच कुत्ता डोसाच्या टोळीत सहभागी झाला. 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात तो गुजरातमध्ये शस्त्रास्त्रे उतरवण्यात सहभागी होता. सलीम आणि त्याच्या साथीदारांनी शस्त्रे-आरडीएक्स गोळा करून इतर आरोपींना वाटले होते. या स्फोटकांचा वापर 1993 च्या बॉम्बस्फोटात  करण्यात आला होता.
 
 
 
 
 
1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या कटात भाग घेतल्याबद्दल आणि स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा वाटप केल्याबद्दल ट्रायल कोर्टाने सलीमला दोषी ठरवले होते. सलीम सध्या येरवडा कारागृहात आपली शिक्षा भोगत आहे. 
Powered By Sangraha 9.0