Bhaskar Jadhav : विधानसभेत लक्षवेधी न लागत नसल्याचा आरोप करून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. अधिवेशनात माझी लक्षवेधी लागली नाही. हे सतत माझ्याबरोबर घडत आहे. माझा हक्क डावलण्यात येत आहे, असा आरोप भास्कर जाधवांनी केला. तर, यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनातून गैरसमज काढून टाकावा, अशी विनंती केली.
जाधव म्हणाले, मला सभागृहात बोलायला दिले पण माझी लक्षवेधी लागली नाही. मी आपले अभिनंदन एवढ्यासाठी करतो की, याही अधिवेशनात सात डिसेंबरला माझी लक्षवेधी लागली होती. काही कारणास्तव ती पुढे गेली. लक्षवेधी पुढे गेल्यानंतर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी ती लागते. मात्र, याही वेळेला माझी लक्षवेधी लागली नाही. हे सातत्याने माझ्याबाबत घडत आहे. माझा हक्क डावलण्यात येत आहे. अध्यक्षांकडून माझ्यावर आणि मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे. तो अन्याय होऊ नये म्हणून मी विनंती केली. मात्र, अभिनंदन करून मला आपला आणि खुर्चीचा अपमान करायचा नाही, असे Bhaskar Jadhav भास्कर जाधवांनी सांगितलं.
सदस्य उपस्थित नसल्यावर लक्षवेधी स्थगित करतो
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, भास्कर जाधवांनी लक्षवेधी पुढे ढकलण्याचे कारण तपासले जाईल. सभागृहात सदस्य उपस्थित नसल्यावर ती लक्षवेधी आपण स्थगित करतो अथवा सदस्यांच्या विनंतीनंतर पुढे ढकलतो. मंत्री उपस्थित नसल्याने किंवा उत्तर आले नसल्याने लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली असेल, तर ती बुधवारच्या कामकाजात दाखवेन.
गैरसमज काढून टाकावा
सभागृहात काम करताना कुठलाही अध्यक्ष सदस्यांना लक्ष्य करून बोलण्याची संधी नाकारू शकत नाही. त्यामुळे आपण गैरसमज काढून टाकावा, अशी विनंती राहुल नार्वेकरांनी Bhaskar Jadhav भास्कर जाधवांना केली.