‘मिचॉन्ग'मुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता

    दिनांक :02-Dec-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
Michaung cyclone पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याच्या Michaung cyclonee प्रभावाने ४ डिसेंबरपर्यंत देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तयार होणाऱ्या या चक्रीवादळाला मिचॉन्ग असे नाव देण्यात आले आहे. रविवारी महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
 
 
Michaung cyclone
 
Michaung cyclone दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील चोवीस तासांत अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभावही कायम राहणार आहे, त्यामुळे पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी होईल आणि लगतच्या मैदानी प्रदेशात थंडीची लाट येईल. मिचॉन्गचा धोका दक्षिण आंध्रप्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
 
Michaung cyclone तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल किनारपट्टीसाठी हवामान कार्यालयाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तामिळनाडूतील कांचीपुरम् आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होणयाची शक्यता आहे. ४ डिसेंबरपर्यंत उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.