राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका वाटपास प्रारंभ

02 Dec 2023 18:28:13
अयोध्या, 
Ram Mandir राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रण पत्रिका वाटपास सुरुवात झाली आहे. Ram Mandir राममंदिरात २१ जानेवारीपासून मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सुरू होणार आहे. सोहळ्यासाठी १३६ सनातन परंपरेतील २५ हजार साधू-संतांशिवाय १० हजार खास पाहुण्यांना निमंत्रित केले जाणार आहे.
 
 
Ram Mandir
 
Ram Mandir राममंदिरात २१ जानेवारीपासून मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सुरू होणार आहे. हा धार्मिक विधी २३ जानेवारीपर्यंत राहणार आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्यासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात येणार आहे. साधू-संतासह महनीय व्यक्तींना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा राजकीय राहणार नाही. सोहळ्याच्या ठिकाणी व्यासपीठ असणार नाही. कोणत्याही प्रकारची जनसभा घेण्यात येणार नाही. विविध राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे. ज्यांना या सोहळ्यास यायची इच्छा असेल, ते येऊ शकतात.
 
भाविकांसाठी महिनाभर मोफत अन्नछत्र
या सोहळ्यानिमित्त देशभरातील भाविक अयोध्येला Ram Mandir भेट देण्याची शक्यता आहे. जानेवारीत एक महिन्यासाठी भाविकांसाठी मोफत अन्नछत्राची सुविधा करण्यात येणार आहे. दररोज एक लाख भाविकांना भोजन देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0