फिश टँकच्या बांधकामाशी संबंधित प्रकरणात ईडीची कारवाई

    दिनांक :02-Dec-2023
Total Views |
नवी दिल्ली,  
construction of fish tank फिश टँकच्या बांधकामासाठी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मंजूर करण्याच्या फसवणुकीच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सहा ठिकाणी शोध घेतला. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट  (PMLA)- 2002 अंतर्गत केंद्रीय तपास यंत्रणेने ही शोध मोहीम राबवली आहे.
 
construction of fish tank
 
ईडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली पीएमएलएच्या तरतुदींनुसार 29 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील कर्ज जमा करणाऱ्यांची सहा निवासस्थाने आणि कार्यालय परिसरात शोध मोहीम घेण्यात आली. construction of fish tank ईडीने सांगितले की, शोध मोहिमेत डिजिटल उपकरणे आणि विविध अपराधी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच या शोध मोहिमेदरम्यान मिळकतीतून मिळवलेल्या अनेक चल-अचल मालमत्तांची माहिती देणारी कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.