मुंबई :
Dnyaneshwar शिवराज अष्टकातील चित्रपटांच्या मोठ्या यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता संत Dnyaneshwar ज्ञानेश्वरांची मुक्ताईची निर्मिती करीत आहे. मागील दिवसांत आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, यात संत ज्ञानेश्वरांच्या छायेत बसलेल्या दिव्य मुक्ताई दिसून येत आहे.
Dnyaneshwar महाराष्ट्रातील महान संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईतून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर मांडणार आहे. अगदी लहानशा आयुष्यात मुक्ताईने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देत स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. ही कथा चित्रपटांत मांडण्यात आली आहे. मुक्ताईचे माता, भगिनी, गुरू असे वेगवेगळे पदर उलगडणारा हा नवा चित्रपट असेल, असे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी म्हटले आहे. चित्रपटाची प्रस्तुती ए. ए. फिल्म्स ही संस्था करीत असून, जूनमध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.