जालना,
Stone pelting माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याच्या घटनेनंतर आता माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या Stone pelting घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून हा राडा झाल्याचे बोलले जात आहे. राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप लोणीकर यांच्याकडून करण्यात येत आहे.
Stone pelting शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. यावरून लोणीकर विरुद्ध टोपे असा वाद पाहायला मिळत आहे. आज दुपारी राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. यामागे लोणीकर असल्याचा आरोप टोपे यांनी केला होता. त्यानंतर आता लोणीकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. राजेश टोपे यांची गाडी फोडल्याच्या घटनेनंतर आक्रमक झालेल्या टोपे समर्थकांनी लोणीकरांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप होत आहे. यावेळी बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, माहिती मिळताच लोणीकर समर्थक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.