व्हीएमव्ही क्लबने पटकावले विजेतेपद

02 Dec 2023 22:22:35
- व्हॉलीबॉल सामने उत्साहात

अमरावती, 
साई क्रीडा मंडळ व शौर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय Volleyball tournament व्हॉलीबॉल खुले सामने देशपांडे लेआऊट, दस्तुर नगर येथील शौर्य क्रीडा मंडळाच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेतेपद व्हीएमव्ही क्लबने पटकावले आहे.
 
 
Volleyball tournament
 
परिसरातील नागरिकांद्वारे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शौर्य क्रीडा मंडळाच्या नामफलकाचे सुद्धा उद्घाटन भाजपा नेते तुषार भारतीय यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लगेच सामन्यांना सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व 22 संघांनी सहभाग नोंदविला. अकोला, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील व विदर्भातील विविध संघांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सायंकाळी समाजसेवक नितीन कदम, भाजयुमोचे प्रदेश महामंत्री बादल कुळकर्णी व इतर मान्यवरांनी स्पर्धेला भेटी दिल्या व खेळाडूंचा उत्साह वाढवला. रात्री उशिरा रोमांचक असा अंतिम सामना पार पडला. त्यामध्ये व्हीएमव्ही क्लबने विजेतेपद पटकावले. द्वितीय पारितोषिक अंबापेठ क्रीडा मंडळाने पटकावले. तसेच तृतीय पारितोषिक बडनेराच्या युथ बॉईज संघाने पटकावले. आयोजन समितीच्यावतीने सर्व विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.
 
 
Volleyball tournament या एक दिवसीय स्पर्धेच्या आयोजनात रिद्धेश देशमुख, महेश बुंदले, तन्मय राऊत, मनीष नाकिल, अभिजित देशमुख, सूरज यादव, श्रेयस देशमुख, समर्थ देशमुख, पवन वानखडे, शाश्वत कठाळे, हर्षित देशमुख, समर्थ म्हाला, नीलय गावंडे, अथर्व काळे, श्रवण वानखडे, प्रथमेश शेंद्रे, आदर्श कान्हा, संकेत शेगोकार आदींनी सहकार्य केले. मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू सतीश शुक्ला, शरद यादव, अभिजित गावंडे, राहुल कालसर्पे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. निक्कू खालसा व सदस्य स्वप्निल वाघमारे, संकेत बाखडे यांची विशेष उपस्थिती होती. या पुढेही अशा क्लबच्या सामन्यांचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात येईल, अशी माहिती स्वप्निल वाघमारे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0