तभा वृत्तसेवा
दर्यापूर,
Daryapur Tour : कपाशीचे उत्पन्न कमी येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी निराश झाला होता. तुरीच्या उत्पन्नावर आता भिस्त असल्याचे सांगत शेतकर्याने नवे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली. यातच बुधवारी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला सर्वोच्च 12,100 असा भाव मिळाल्यामुळे शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची उलाढाल होत आहे. गेल्या काही दिवसाआधी सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात बाजार समितीत होत होती. आता नुकतीच नव्याने निघालेल्या Daryapur Tour तुरीची आवक दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झाली आहे. बुधवारी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी तूर उत्पादक शेतकरी शकिर पटेल रा. वडाळी सटवाई व अडते देवेंद्र राठी, खरेदीदार अनिस घाणीवले यांचा सत्कार करत तूर खरेदीचा शुभारंभ केला.
नव्या तुरीला 12 हजार 100 रुपये भाव देत तूर खरेदी करण्यात आली. Daryapur Tour यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील तराळ, संचालक राजू राठी, असिफ खान, बाजार समितीचे सचिव हिम्मतराव मातकर, कोकाटे , अनिस घाणीवाले, संतोष खंडेलवाल, केतन शहा, कृष्णा राठी, गुणवंत पाटील गावंडे, गोपाल बायस्कर, भैयासाहेब देशमुख, उमेश कोकाटे, बाळासाहेब गावंडे आणि अडते, व्यापारी, कास्तकार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.