सार्वजनिक उद्योगांचा भांडवली खर्च 52 टक्क्यांवर

    दिनांक :20-Dec-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील CPSE Industries  (सीपीएसई) उद्योगांचा भांडवली खर्च चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 3.79 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या 52 टक्क्यांवर पोहोचला आहे, असे वित्त मंत्रालयाने बुधवारी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल-सप्टेंबर या कालावधीतील सीपीएसईएसच्या भांडवली मूल्यापेक्षा हे जास्त आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, हा आकडा 2.85 लाख कोटी रुपये किंवा 2022-23 आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 43 टक्केहोता.
 
 
CPSE Industries
 
अर्थ मंत्रालयाने ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले की, CPSE Industries सीपीएसईतील उद्योग सीपीएसईचे भांडवली खर्च सीपीईएक्स लक्ष्य सप्टेंबर 2023 पर्यंत 51.71 टक्के साध्य करण्यात आले आहे. संपूर्ण 2023-24 साठी 7.33 लाख कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या तुलनेत 30 सप्टेंबरपर्यंत 3.79 लाख कोटी रुपये (अंदाजे) साध्य झाले. म्हणजे सुमारे 51.71 टक्के आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. 2022-23 आर्थिक वर्षात सीपीएसईद्वारे पूर्ण वर्षाचा भांडवली खर्च 6.62 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज होता.