राजस्थानात मुस्लिम आमदाराची संस्कृतमध्ये शपथ

20 Dec 2023 20:04:42
- तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून विजयी
 
जयपूर, 
राजस्थानात काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका होऊन निकालानंतर भाजपाचे सरकार सत्तारूढ झाले. राजस्थानच्या 16 व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन बुधवारी बोलावण्यात आले. त्यावेळी नवीन आमदारांना काळजीवाहू विधानसभा अध्यक्षांनी शपथ दिली. यादरम्यान डिडवाना मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेले MLA Yunus Khan आमदार युनूस खान यांनी संस्कृतमध्ये शपथ घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोबतच दुसरे आमदार जुबेर खान यांनीही संस्कृत भाषेत शपथ घेत युनूस खान यांच्या पावलावर पाऊल ठेवले.
 
 
MLA Yunus Khan
 
राजस्थानच्या राजकारणात युनूस खान हे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. डिडवाना येथून तिकीट न मिळाल्याने खान यांनी तेथूनच अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांना 70, 952 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या चेतनसिंह चौधरी यांचा 2,392 मतांनी पराभव केला. या जागेवर भाजपाचे उमेदवार जितेंद्र सिंह यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. विजयानंतर MLA Yunus Khan युनूस खान यांनी देशनोक येथील करणी मातेच्या दरबारात दर्शन केले.
 
 
आठ आमदारांची शपथ बाकी
बागी दौरा येथील आमदार महेंद्रजित मालवीय, दंतरामगडचे वीरेंद्रसिंह, रायसिंग नगरचे सोहनलाल नायक, तिजारा विधानसभा मतदारसंघाचे महंत बालकनाथ, नादबाईचे जगतसिंह, बांदिकुईमधून भागचंद टकरा, वैरचे बहूदरसिंह कोळी आणि निंबाहेराचे श्रीचंद कृपलानी यांनी शपथ घेणे बाकी आहे. आतापर्यंत 191 आमदारांनी शपथ घेतली आहे.
13 आमदारांची संस्कृतमध्ये शपथ
राजस्थान विधानसभेत आज भाजपाचे आमदार झोराराम कुमावत, नोक्षम चौधरी, जेतानंद व्यास, पब्बराम विश्नोई, महंत प्रतापपुरी, बाबूसिंह राठोड, दीप्ती मोहेश्वरी, कैलाश मीना, गोपाल शर्मा, छगनसिंह, जोगेश्वर गर्ग, तर काँग्रेसचे जुबेर खान यांच्यासह अपक्ष आमदार MLA Yunus Khan युनूस खान यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
Powered By Sangraha 9.0