अहमदाबाद,
Surat Diamond Market : गुजरातमधील सूरत हिरे बाजार नवीन भारताचे सामर्थ्य आहे. या बाजाराचे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. व्हायब‘ंट गुजरात ग्लोबल समिट या नवीन हिरे बाजाराच्या वाढीला आणखी चालना देणार आहे. केंद्र सरकारचे रत्न आणि दागिन्यांसाठीचे महत्त्वाकांक्षी निर्यात लक्ष्य साध्य करण्यात मदत करेल. त्यामुळे या बाजाराची वार्षिक उलाढाल 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. उद्योग आणखी 1.5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे, असे मत हिरे उद्योग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आगामी 10 ते 12 जानेवारी या काळात गांधीनगर येथे 10 वी व्हायब‘ंट गुजरात ग्लोबल समिट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत रविवारी विस्तीर्ण सूरत हिरे बाजाराचे लोकार्पण केले व हे नवीन भारताचे सामर्थ्य आणि निर्धाराचे प्रतीक असल्याचे नमूद केले. गुजरातमधील हिरे क्षेत्र हे जगातील 10 हिरे उद्योगांपैकी आठवे मोठे उद्योग क्षेत्र आहे. सूरत येथील हिरे उद्योग क्षेत्रात सुमारे आठ लाख पॉलिशर्सद्वारे प्रकि‘या केली जातात.
व्हायब‘ंट गुजरात ग्लोबल समिटमुळे हिरे, रत्न आणि दागिने क्षेत्राच्या वाढीस मदत होईल व त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सध्या जागतिक निर्यातीत हिरे क्षेत्राचा 3.5 टक्के वाटा आहे व केंद्र सरकार ही टक्केवारी दुहेरी आकड्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निर्धारित करेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
सूरतच्या हिरे क्षेत्राने सुरुवातीपासून 8 लाख लोकांना रोजगार दिला आहे. आता सूरत डायमंड बाजार आणखी 1.5 लाख लोकांना रोजगार देत आहे. मी हिरे व्यापार व्यवसायातील माझ्या सर्व मित्रांचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी रात्रंदिवस काम केले आहे. या उद्योगाला चालना दिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते.