गडचिरोली,
Gondwana University : गोंडवाना विद्यापवीठात रासेयो विभागाच्या वतीने आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात सोमवारपासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हान-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून सदर शिबीराचे आयोजन केले जाते. सदर 25 डिसेंबर ते 3 जानेवारी असे तब्बल 9 दिवस चालणार आहे. गोंडवाना विद्यापीठात यावर्षी प्रथमच हे शिबीर होत आहे. या शिबीरास 22 विद्यापीठातील 580 विद्यार्थी आणि 420 विद्यार्थिनी स्वयंसेवक असे एकूण 1000 विद्यार्थी याशिवाय 37 पुरुष कार्यक्रम अधिकारी आणि 37 महिला कार्यक्रम अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेतून दिली.
शिबिराचे उद्घाटन Gondwana University सोमवारी दुपारी वाजता होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, जिल्हाधिकारी संजय मीणा, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, एनडीआरएफ कमांडर एस. बी. सिंग हे उपस्थित राहणार आहेत.
या Gondwana University शिबिराच्या यशस्वीतेसाठी विविध 30 समित्या नेमण्यात आल्या आहेत. या शिबिरात पूर, सर्पदंश, अपघात, ह्दयविकार, आग, भुकंप आदी आपत्तीच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घेऊन जिवीत व वित्तहानी टाळता येईल याबाबतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोज योगा, मेडिटेशन, आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग, आपत्कालीन परिस्थित लढण्याची पूर्वतयारी, आग नियंत्रण करण्याच्या पद्धती, पूर परिस्थिती हातळण्याचे प्रशिक्षण, मोटीव्हेशनल स्पीच असा दिवसभराचा कार्यक्रम राहणार आहे.
या Gondwana University शिबिराचा समारोप 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, आमदार प्रतिभा धानोरकर, रासेयोचे (महाराष्ट्र-गोवा) प्रादेशिक संचालक डॉ. अजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे यावेळी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी सांगीतले. या पत्रपरिषदेला प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्यासह कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, डॉ. चंद्रमौली, डॉ. अनिल चिताडे, डॉ. खंडारे आदी उपस्थित होते.