नाना नानी पार्क झाले पिकनिक स्पॉट

आ अँड.फुंडकर यांच्या कामाचे होत आहे सर्वस्तरातून कौतुक

    दिनांक :22-Dec-2023
Total Views |
 खामगाव ,
Nana Nani Park लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाना नाणी पार्क हे आता केवळ एक उद्यान नाही तर शहरातील आवडते पिकनिक स्पॉट झाले आहे. आ अँड फुंडकर यांनी अतिशय सुंदर विकसित केलेल्या या पार्कच्या कामाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 

Nana nai park 
 
लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या संकल्पनेतून खामगाव शहरातील जलंब रोडवर नाना नानी पार्क आ. अँड. आकाश फुंडकर यांनी साकारले आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी मोठ्या संख्येने खेळणी, सर्व स्तरातील महिला व पुरुषांकरिता ओपन जिम, मोठे व्यासपीठ, योगासाठी स्वतंत्र्य व्यवस्था, मोठे लॉन, पहाटे व सायंकाळी फिरण्यासाठी मोठा ट्रॅक, आकर्षक विद्युत व्यवस्था, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, सेल्फी पॉईंट, वयोवृद्धांसाठी बसण्यासाठी वेगळी व्यवस्था, स्वच्छतागृह आदी कामे अतिशय उत्तमरीत्या आ. अँड. आकाश फुंडकर यांनी स्वतः लक्ष घालून केलेली आहे. त्यामुळे या पार्कमध्ये पहाटे सकाळी व रात्री मोठ्या संख्येने संपूर्ण परिवारासह नागरिक येतात. त्यांचे सह त्यांचे लहान मुलं सुद्धा येथे आनंद घेतात. आता नाना नानी पार्क मध्ये शाळकरी मुलांच्या सहली सुद्धा मोठ्या संख्येने येत आहेत. खामगाव शहरच नाही तर इतर शहरातून व ग्रामीण भागातील शाळांचेही विद्यार्थी येथे सहली करता येत आहेत. नुकतेच दोन दिवस शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ चे दोनशे विद्यार्थी सहलीसाठी नाना नानी पार्क आले होते या मुलांनी या पार्कमध्ये मनसोक्त आनंद लुटला. तसेच त्यांच्या प्राध्यापकांनीही या पार्कवर चांगला वेळ घालवला. हे पार्क पाहून त्यांनी आ अँड आकाश फुंडकर यांचे तोंड भरून कौतुक केले. शाळकरी मुलच नव्हे तर शहरात कोणाच्या घरी पाहुणेमंडळी आली तर ते सुद्धा या पार्कला भेट देऊन आपला चांगला वेळ घालवत आहे. खामगाव शहरातही प्रत्येक वार्डात आ अँड आकाश फुंडकर हे लहान मोठे उद्यान बनवीत आहेत त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.