वाराणसी,
ASI report वाराणसी न्यायालयाने गुरुवारी ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग अर्थात् एएसआयचा अहवाल 3 जानेवारी रोजी उघडला जाणार असून, त्यावेळी संबंधित याचिकाकर्त्यांना अहवालाची प्रत दिली जाणार आहे. मुस्लिम पक्षाचे वकील अखलाख अहमद यांच्या याचिकेनुसार, जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेशा यांनी अहवाल उघडण्यासाठी तसेच त्याच्या प्रती सर्व पक्षांना उपलब्ध करण्यासाठी 3 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे, असे हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यांनी सांगितले.
बार कौन्सिलची निवडणूक शुक‘वारी होणार असल्याने न्यायालयात हजर राहू शकणार नाही, असे अखलाक अहमद यांनी न्यायालयाला सांगितले. पुरातत्त्व विभागाने 18 डिसेंबर रोजी सीलबंद लिफाफ्यात सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर केला आहे. 17 व्या शतकातील ही मशीद मंदिरावर उभारल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर न्यायालयाने शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्याचा आदेश पुरातत्त्व विभागाला दिला होता. ASI report न्यायालय 21 डिसेंबर रोजी हा अहवाल उघडणार होते तसेच सर्व पक्षांना देणार होते. हा अहवाल सार्वजनिक केला जाऊ नये, अशी मागणी मुस्लिम पक्षाने, तर तो सार्वजनिक करावा, अशी मागणी हिंदू पक्षाने केली आहे.