तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
MP Bhavna Gawli : केंद्र व राज्य सरकारच्या 302 कोटींच्या अमृत योजनेचा यवतमाळात फज्जा उडाला आहे. आजही नागरिकांना सात ते आठ दिवस आड पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. दरम्यान या योजनेत झालेल्या गैरप्रकारावरून खासदार भावना गवळी MP Bhavna Gawli यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
जीवन प्राधिकरणने युद्धपातळीवर काम करून अमृत योजनेचे काम पूर्ण करून घ्यावे याकरिता लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना दिल्या. याकरिता नागरिकांनी अनेकदा आंदोलन केले, मात्र अमृत योजना पूर्ण झाली नाही. हा संतापजनक प्रकार बघून यापूर्वीच खा. गवळी यांनी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. या प्रकरणात कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश निघाले, मात्र हा आदेश थंड बस्त्यात पडला. 2019 मध्ये पूर्ण करायची अमृत योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनातील संताप खासदार भावना गवळी यांच्या माध्यमातून लोकसभेत व्यक्त झाला.
केंद्र तसेच राज्य सरकारने कोट्यवधी रुपये दिल्यानंतरही ही योजना अपूर्ण आहे. या योजनेत 50 टक्के निधी केंद्र सरकारचा असल्यामुळे समिती पाठवून चौकशी करण्याची मागणी त्यांनी लोकसभेत केली. मागील वर्षीचा उन्हाळासुद्धा नागरिकांचा पाण्यासाठी भटकंती करण्यात गेला. आठ दिवस आड पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने नागरिक संतप्त आहेत. अनेक भागात तर बारा ते पंधरा दिवस आड पद्धतीने पाणी पुरवठा सुरू आहे. MP Bhavna Gawli अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट दिसून येत असतानाही कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. कंत्राटदार तसेच अधिकार्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे आतातर जनतेचा जीव धोक्यात आला आहे. निकृष्ट काम आणि हलक्या दर्जाची असल्यामुळे पाच वेळा पाईपलाईन फुटली. अठठावीस किलोमिटर पाईपलाईन बदलवावी लागली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भविष्यातसुद्धा पाईप फुटून यवतमाळकरांना धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे सखोल चौकशी करुन कंत्राटदार तसेच संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी खा. भावना गवळींनी लोकसभेत केली. या प्रश्नावर उत्तर देताना आम्ही राज्य सरकारकडून माहिती घेणार, तसेच कारवाई करणार असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले.
कारवाईसाठी पाठपुरावा करणार
कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे आज तीन वर्षे झाल्यानंतरही अमृत योजनेचे काम अर्धवट पडलेले आहे. यवतमाळ नगर परिषदेत परिसरातील आठ ग्रामपंचायत समाविष्ट करण्यात आल्यामुळे लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अमृत योजनेचे पर्याप्त पाणी मिळणे गरजेचे आहे. कंत्राटदार मात्र काहीच करायला तयार नसल्यामुळे मी लोकसभेत कंत्राटदाराविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे, असे खा. भावना गवळींनी MP Bhavna Gawli सांगितले.