अर्जुनी मोरगाव,
EVM Machine Awareness Campaign : देशातील निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे घेतल्या जातात. या ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये ईव्हीएम जनजागृती मोहीम सुरू झाली आहे.
2024 हे निवडणुकांचे वर्ष म्हणून गणले जाणार आहे. यावर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात पार पडतील. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरु आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यातंर्गत तालुक्यात जनजागृती मोहिम सुरु झाली असून ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाने नगरपंचायत कार्यालयात प्रात्याक्षिक करुन दाखविले.
यावेळी मुख्याधिकारी राजू घोडके, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, नगरपंचायतचे कर्मचारी, नगरसेवक आणि नागरिकांनी प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे, विधानसभा क्षेत्रात तहसील कार्यालयात एक युनिट एक फिरते पथक तर सडक अर्जुनी तालुक्यात दोन फिरते पथक तयार करण्यात आले आहेत. हे पथक शासकीय कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट यांची ओळख मतदारांना करून देत आहे.
तर मतदार प्रत्यक्ष मतदान करून प्रक्रिया समजून घेत आहेत. निवडणूक काळात मतदार ईव्हीएम संदर्भात जागरूक होण्यासाठी या मोहिमेचा लाभ मतदारांनी घेण्याची आवाहन तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी केले आहे. या पथकामध्ये मंडळ अधिकारी सुरेशसिंह पवार, तलाठी सुरेश झलके यांचा समावेश आहे.