विवेकानंद विद्यालयात गीता जयंती उत्साहात

23 Dec 2023 16:25:26
आमगाव
Gita Jayanti येथील श्री स्वामी विवेकानंद विद्यालयात 22 डिसेंबर रोजी मुख्याध्यापिका स्मृती छपरीया यांच्या मार्गदर्शनात गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात भगवद्गीतेचे पूजनाने करण्यात आली.
 
 
geeta jaynti
 
यावेळी शिक्ष्ज्ञिका सारीका श्रीवास्तव यांनी, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनानेच अर्जुनाने असत्यावर सत्याने विजय मिळवली होता. त्याचाच संदेश देणारी भगवद्गीता जर आम्हीही नियमित वाचन केले तर आपल्यालाही नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.Gita Jayanti  वनिता उपाध्याय यांनी भगवद्गीतेतील 18 अध्याय अध्यायांची माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध नृत्याच्या माध्यमातून आमच्या दैनंदिन जीवनात भगवद्गीतेचे महत्व अनन्यसाधारण आहे हे पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन सृष्टी पवार व त्रिदास कटरे या विद्यार्थिनींनी तर तर आभार मरियम घाची हिने केले. दरम्यान, राजस्थानी भवनात गीता परिवारातर्फे आयोजित गीता जयंती कार्यक्रमात श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल आमगावच्या विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून भगवद्गीतेचे महत्त्व पटवून दिले.
 
Powered By Sangraha 9.0