अमेरिकेला जाणारा ‘डाँकी मार्ग' !

23 Dec 2023 18:43:55
नवी दिल्ली,
 
 
donkey route to us सध्या बॉलीवूडमध्ये डंकी या शाहरुख खान अभिनीत चित्रपटाची बरीच चर्चा आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडेही चकीत करणारे आहेत. मुळात डंकी हे नावच वेगळ्या धाटणीचे असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. donkey route to us आपणही जाणून घेऊ या, काय आहे डंकी? बेकायदेशीर पद्धतीने भारतातून अतिश्रीमंत पाश्चिमात्त्य देशांमध्ये जाण्यासाठी धडपडणाऱ्या  भारतीयांचा मार्ग म्हणजे डाँकी रूट! यासाठी पंजाबमध्ये ‘डंकी' हा शब्द प्रचलित आहे.
 
 
 
donkey route to us
 
 
डंकी हा एक पंजाबी शब्द आहे. स्वतःच्या देशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय आणि बेकायदेशीरपणे बाहेर पडायचं आणि लपून-छपून प्रवास करीत, दुसऱ्या देशात प्रवेश करण्याच्या मार्गालाच डाँकी रूट किंवा डंकी रूट म्हटलं जातं. हा रस्ता जंगलातून, समुद्रातून किंवा वाळवंटातूनही असू शकतो. donkey route to us आपल्या देशातील पंजाब, हरियाणा आणि गुजरातमधून अशा डाँकी रूटने लोक विदेशात पलायन करीत असल्याची नोंद आहे. अशा प्रवाशांचे मार्गात मृत्यू किंवा हत्या झाली तरी त्याची काहीच नोंद होत नाही. बेकायदेशीरपणे विविध देशांमध्ये थांबे घेत, शेवटी हव्या त्या देशात पोहचायचं आणि त्यांना आश्रय मागायचा, अशी ही पद्धत आहे. कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी येणाèया खर्चापेक्षा कमी खर्च, आवश्यक परीक्षा देण्याची गरज नाही आणि कागदपत्रे जमविण्याची कटकट नाही, या विचाराने लोक डंकी रूटचा पर्याय स्वीकारतात.
 
 
donkey route to us १
 
donkey route to us लॅटिन अमेरिकतील एल साल्वाडोर, गयाना, इक्वेडोर, बोलिव्हिया अशा देशांमध्ये जाणं भारतीयांसाठी सोपं आहे. यापैकी काही देश भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल देतात. ब्राझील, व्हेनेझुएला आणि कोलंबिया या देशांचीही व्हिसाची प्रक्रीया तुलनेने सोपी आहे. त्यामुळे डाँकी रूटच्या प्रवासाचा पहिला टप्पा याच देशांमधून सुरू होतो. बेकायदेशीरपणे अमेरिकेत नेणाऱ्या एजंट्सचे कोणत्या देशातील मानवी तस्करांशी संबंध आहे यावरून डाँकी रूट कसा असेल ते ठरतं. लॅटिन अमेरिकेतील देशात जाण्यासाठीदेखील काही महिने वाट बघावी लागते. donkey route to us हा प्रवास कोलंबिया आणि पनामाला जोडणाऱ्या डॅरियन गॅपच्या धोकादायक जंगलातून पायी करावा लागतो आणि हे जंगल पार करण्यासाठी किमान आठवडा लागतो. जंगली प्राणी, या प्रवासादरम्यान मानवी वस्ती नाही आणि घेऊन जाणाऱ्या टोळ्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असतात.
 
 
donkey route to us २
 
शेतीवाडी किंवा घर विकून काही लोक जातात आणि ते या जंगलाचा प्रवास टाळण्यासाठी जास्त पैसे खर्च करून थेट मेक्सिकोला पोचतात. या मार्गाने प्रवास करताना साधारण १५ लाखांपासून ७० लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. प्रवासात धोका जितका जास्त, तेवढे पैसे कमी असं सरळ गणित आहे. donkey route to us इतकी उठाठेव करून, त्या देशात पोहचलेल्यांना आश्रय मिळेलच, याची शाश्वती नसते. आश्रय मिळवण्याची एक मोठी प्रक्रीया आहे. मायदेशात छळ होतो, वंश, वर्ण किंवा धार्मिक कारणांवरून भेदभाव, जीवाला धोका अशा कारणांसाठी आश्रय मागता येतो. संबंधित अधिकारी मुलाखतीनंतर कोर्टात हजर करतो आणि न्यायालयाच्या परवानगीनंतर आश्रय देण्याची प्रक्रीया पूर्ण होते. परदेशातील ऐशोआरामाच्या जीवनशैलीबद्दलच्या कल्पनांनी अनेक लोक जीव धोक्यात घालून हा मार्ग पत्करतात. donkey route to us यात आर्थिक फसवणूक, छळ, गैरव्यवसायात पडणे आणि प्रसंगी जीवाचाही धोका असतो. आपल्याच मातृभूमीची बदनामी करून, केवळ विदेशात राहण्याचा आनंद मिळविण्यासाठी कुठल्या थराला जायचं? हा प्रश्न कायम राहतो.
 
(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार) 
Powered By Sangraha 9.0