तभा वृत्तसेवा
पवनार,
Akshata Kalash : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून अक्षता कलश पवनार येथे आज रविवार 24 रोजी सकाळी 9 वाजता दाखल झाले. कलश गावात आल्यानंतर गावातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर येथील राम मंदिरात अक्षता कलश स्थापन करण्यात आले. आपले गाव आपली अयोध्या, असा संकल्प करून प्रत्येक घरी ही अक्षता पोहचावी अशी संकल्पना आहे.
ही Akshata Kalash रॅली बसस्थानक, ग्रामपंचायत, बाजार चौक, दीपक उमाटे वर्कशॉप, बोकड मेडिकल, दीपक राऊत, अण्णाभाऊ साठे चौक, पुरातन हनुमान मंदिर, चिंतामणी देवस्थान, नंदी खो, अशी मार्गक्रमण करीत राम मंदिरात समापन करण्यात आली. अक्षता कलश राम मंदिरात ठेवण्यात आला. ही रॅली बजरंग दलाचे संयोजक बबलू राऊत यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली होती. रॅलीत गावातील भजन मंडळींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.