पूजा वर्गाचा गीता जयंती उत्सव साजरा

24 Dec 2023 12:36:57
 
ks 
 
नागपूर,
 Geeta Jayanti धरमपेठ माता मंदिर येथे गीता जयंतीनिमित्त पूजा वर्गाने गीता पठण हा कार्यक्रम घेतला होता.गुरुवर्य विशाखा पाठक यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या संख्येने पूजावर्गातील भगिनींनी गीता पठण केले.यावेळी भगवद् गीता आणि भगवान श्रीकृष्ण यांची धरमपेठ परिसरातून पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती.श्री कृष्ण गीत, भजन आणि हरे कृष्ण नाम जप करून पूर्ण परिसरात आनंद व  भक्तीमय वातावरण तयार झाले होते. रंजना भांडारकर यांनी भगवद् गीतेची आरती केली. प्रसाद वितरणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
सौजन्य: संगीता वाईकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0