जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

    दिनांक :24-Dec-2023
Total Views |
रिसोड,
Narendracharya Maharaj : जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिण पिठ यांचे वतीने नरेंद्राचार्य महाराज याचा पादुका दर्शन सोहळा बालाजी रिसॉर्ट अँड लॉन्स रिसोड येथे २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
 
Narendracharya Maharaj
 
नरेंद्राचार्य महाराज Narendracharya Maharaj  संस्थांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर, मोफत रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रातील विविध महामार्गावर ४२ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित केले जातात.
 
 
या पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी पादुका गुरुपुजन सोहळा, Narendracharya Maharaj  श्री च्या पादुकांचे आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपुजन, आरती सोहळा, प्रवचन, भक्त दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी संपन्न होणार आहे. या पादुका दर्शन सोहळ्यास संपूर्ण जिल्हा सेवा समिती, पीठ समिती सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सेवा समिती, सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समिती, युवा सेना, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, गुरु सेवक, प्रोटोकॉल अधिकारी, प्रवचनकार, जिल्ह्यातील सर्व आजी व माजी पदाधिकारी, उपासक, साधक, शिष्य, भक्तगण, हितचिंतक जिल्ह्यातील सर्व गुरु बंधू व गुरु भगिनी यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीने माधवराव काळे, निरीक्षक संजय संचेती, जिल्हाध्यक्ष जिल्हा सेवा समिती यांनी केले आहे.