‘ते’ असुविधा असलेले लेआऊट

    दिनांक :24-Dec-2023
Total Views |
- पारवा ग्रामपंचायतने हस्तांतरित करू नये

पारवा, 
Parwa village :पारवा गावाला लागून असलेल्या संदीप जयस्वाल यांच्या शेतात लेआऊट टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते संदीप काकडे व काही गावकरी बांधवांच्या लक्षात आली. हे लेआऊट हस्तांतरण करण्यापूर्वी पारवा ग्रामपंचायतने नियमांप्रमाणेे सर्व बाबींची पूर्तता संबंधित विकासकाने केली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे निवेदन त्यांनी दिले आहे.
 
 
parva
 
Parwa village : हस्तांतरणाकरिता शासकीय नियमांप्रमाणे ज्या सोयी-सुविधा पूर्ण केल्याची खात्री करून घेतल्याशिवाय ही प्रकि‘या पूर्ण करण्यात येऊ नये. विद्युत पुरवठा, नाल्या, रस्ते, खुले मैदान व पाण्याची व्यवस्था इत्यादी अनेक सुविधा नसलेल्या लेआऊटमधील भूखंडधारकांना पुढे खूप त्रास होतो असा अनुभव आहे. त्यामुळे पारवा ग्रामपंचायतने सर्व बाबींची पूर्तता झाल्याची खात्री करून घेऊनच असे लेआऊट हस्तांतरित करावे असेही या निवेदनात म्हटले आहे.