तभा वृत्तसेवा
सिहोरा,
Shadab Pathan : अखिल भारतीय मैदानी स्पर्धेसाठी राष्ट—संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर तर्फे कर्णधारपदी स्थानिक आर्टस् कॉलेज सिहोरा येथील बी.ए. अंतिम वर्षाच्या विद्यार्थी शादाब पठाण याची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मैदानी स्पर्धा कंलिगा इंस्टीटयुट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नालॉजी विद्यापीठ भुवनेश्वर (ओडिसा) येथे 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहेत.
याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने मैदानी स्पर्धांचे कर्णधार म्हणून Shadab Pathan शादाब पठाणची निवड करण्यात आली. शादाबने मागील तीन वर्षापासून रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे मैदानी स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन चापले, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डॉ. जयकुमार क्षिरसागर, संस्थेचे सचिव कविता गभने, अध्यक्ष दिलीपराव सोमनाथे तसेच प्राध्यापक डॉ. मंजूषा समर्थ, डॉ. मदन प्रधान, डॉ. मनोज सरोदे, डॉ. प्रेमा कुंभलकर, डॉ. चंद्रशेखर भेजे, प्रा. रेणुका पटले प्रा. राजेश अंबुले, प्रा. रवि पारधी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विद्यार्थी, किडा प्रेमींनी अंभिनंदन केले.