नागपूर,
Gosavi Samaj : हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी समाजाने काळाची गरज लक्षात घेवून संघटित होण्याचे आवाहन दशनाम गोसावी समाजाचे योगेश बन यांनी केले. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष महेंद्रगिरी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष उर्मिला भारती, संगीता भारती, सहाय्यक उपायुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती आदिवासी विभाग बबीता गिरी,वरिष्ठ लेखाधिकारी सतीश गोसावी, अशोक गिरी,भैय्या भरती आदी उपस्थित होते.
गोस्वामी शौर्यगाथा Gosavi Samaj पुस्तकाचे लेखक वसंत गिरी मेहकर यांनी गोस्वामी समाजाचा इतिहासाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. अशोक गिरी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ मेेघा भारती यांनी तर संचालन अलका पुरी यांनी केले. आभार गणेश पुरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश पुरी, दिलीप भारती, विजय गिरी, शंकर पुरी आदींनी परिश्रम घेतले.