तभा वृत्तसेवा
मुंबई,
MLA Nitesh Rane : दिशा सालियन मृत्य प्रकरण दडपण्याचा ठपका असणारे मालवणी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांची नव्याने गठित केलेल्या विशेष तपास पथकातून (एसआयटी) तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी करणारे पत्र आमदार नितेश राणे MLA Nitesh Rane यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पोलिस आयुक्तांना पाठविले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मालवणी ठाण्याच्या अधिकार्यांनी थातुरमातुर तपास करून बनावट क्लोझर रिपोर्ट तयार केला आणि तत्कालीन एसीपींमार्फत प्रकरण अपघात दाखवून बंद केले होते. त्यानंतर शासनाने ते प्रकरण पुन्हा हाती घेत पुढील तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले. त्यात चिमाजी आढाव यांना सामील करून घेण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्देशानुसार मालवणी पोलिस स्टेशनचे आधीच्या दोषी अधिकार्यांवर आरोप असल्यामुळे त्या ठाण्याचा कोणताही अधिकारी या प्रकरणाचा तपास करू शकत नाही. त्यामुळे चिमाजी आढाव एसआयटीचे सदस्य राहू शकत नाही. चिमाजी आढाव हे अपात्र असल्यामुळे त्यांची तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी MLA Nitesh Rane नितेश राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.