श्रीराम जन्मोत्सव समिती पाटणबोरीतर्फे अक्षता कलश यात्रेचे आयोजन

    दिनांक :26-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पाटणबोरी,
Akshata Kalash Yatra श्रीराम जन्मोत्सव समिती पाटणबोरीतर्फे ‘अक्षता कलश' यात्रेचे अतीभव्य आयोजन करण्यात आले होते. कालिकामातेच्या मंदिरापासून सजवलेल्या रामरथात अयोध्येवरून आलेला अक्षता कलश ठेवण्यात येऊन मागेपुढे ट्रॅक्टरवर रामायणकालील देखावे, वारकरी भजनमंडळी, दिड्या, महिला, पुरुष, युवक, युवती, शालेय विद्यार्थी, बालगोपाल व आसपासच्या गावातील नागरिक स्वयंस्फूर्तीने मिरवणुकीत सहभागी झाले.
 

Akshata Kalash Yatra 
 
मिरवणुकीतील मार्ग ठिकठिकाणी रांगोळ्या टाकून सुशोभित करण्यात आला होता. तीन-चार तासांचे वातावरण संपूर्ण भगवामय झाले. विशेषत: माता-भगिनींनी लाल वस्त्र परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली. मार्गात ठिकठिकाणी रोषणाई करून फटाके फोडण्यात आले. Akshata Kalash Yatra डिजे वाद्यांसोबत श्रीरामप्रभूंच्या गाण्यासोबत तरुणवर्गाचा उत्साह कमालीचा होता. पाटणबोरीच्या इतिहासात एवढी भव्य धार्मिक मिरवणूक प्रथमच पहायला मिळाली. या मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी अक्षतकलशाचे पूजन करण्यात आले. शेवटी श्रीराम मंदिरात माधवराव मठाचे मठाधीश विजय महाराज यांच्या हस्ते पूजन व महाआरती करून ‘अक्षता कलश' राममंदिरात ठेवण्यात आला. कलशातील अक्षता मिसळून मोठ्या प्रमाणात अक्षता तयार करून १ ते १५ जानेवारी दरम्यान आसपास परिसरात वितरित केल्या जाणार आहेत.