नागपुरात आढळला कोरोना नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण

26 Dec 2023 20:36:49
नागपूर, 
Nagpur Corona : कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नव्या व्हेरियंटचा नागपुरात पहिला रुग्ण मंगळवारी धरमपेठेतील एका 60 वर्षीय वृद्ध आढळून आला. त्यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 9 रुग्णांची नोंद झाली असून ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार (व्हेरियंट) ‘जेएन-1’ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी जेएन-1च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली.
 
Nagpur Corona
 
त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका असे एकूण 10 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात याचे किंचीत प्रमाण वाढत आहे. Nagpur Corona नागपुरच्या मनपा धरमपेठ झोनमधील रहिवासी 60 वर्षीय पुरुषाला सर्दी, खोकला, ताप व इतरही लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत कोरोनाचे 10 रुग्ण झाले असून 9 रुग्णांचे नमुने नव्या व्हेरियंटचे निदान करण्यासाठी ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ साठी पाठविण्यात आले. लवकरच 60 वर्षीय रुग्णाचेही नमुने पाठविण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
Powered By Sangraha 9.0