तभा वृत्तसेवा
अमरावती,
Amravati Central Jail : अमरावती मध्यवर्ती कारागृहात अमरावती व पुणे येथील कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मध्यस्थी करण्यास गेलेले कारागृहातील एक अधिकारी व दोन कर्मचारी व अमरावती येथील कैदी या घटनेत जखमी झाल्याची माहीती आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृहातील Amravati Central Jail अमरावती येथील कैदी बंदीस्त आहे. सदर कैद्यांसोबत पुणे येथील काही कैद्यांचे गत 22 तारखेला भांडण झाले होते. यानंतर अमरावती येथील कैद्याचे नातेवाईक त्यास भेटण्यासाठी आले होते. भेटीनंतर हा कैदी त्याच्या बॅरेकमध्ये परत जात होता. यावेळी पुणे येथील काही कैद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. जेवण करण्याची थाळी वाकवून त्याच्यावर प्रहार करण्यात आल्याने तो जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित अधिकारी व दोन कर्मचार्यांनी अमरावतीच्या बंदीजनास सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कैद्यांनी त्यांच्यावर देखील हल्ला चढविला.
या घटनेची माहीती मिळताच पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह क्यूआरटी पथक व पोलिसांचा ताफा कारागृहात पोहोचला. जखमी कैदी व अधिकारी व कर्मचार्यांना कारागृहातील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. Amravati Central Jail दरम्यान याप्रकरणी हल्लेखोर पुणे येथील कैद्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.