मोदींचे आणखी एक यशोशिखर !

27 Dec 2023 18:46:27
अग्रलेख
Modi's India-rating जगभरात भारताबद्दल आदर वाढतोय् याची प्रचीती अनेक घटनांमधून भारताला येत आहे. विदेशातील अनिवासी भारतीयांना याची जाणीव जास्त आहे. याचे कारण की, ज्या भारतीयांची विदेशात फारशी मोजदाद होत नव्हती, आज त्यांना सन्मानाने विचारले जात आहे. Modi's India-rating भारताचे नाव घेतल्यावर जगाच्या पाठीवर कुठे आहे हा देश, अशी विचारणा होणे बंद झाले आहे. विदेशातील लोकांना भारताचे नाव घेताच ‘ओह! मोदीज इंडिया' असा प्रतिसाद मिळू लागल्याने त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत आहे. दिवाळीचा उत्सव ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारी स्तरावर साजरा होऊ लागला असून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वाढलेल्या महत्त्वाचा अनुभव भारतीय घेत आहेत. Modi's India-rating एकीकडे विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीमुळे भारताची प्रतिमा उंचावण्याची मालिका सुरू असताना पंतप्रधानांचाही मान वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशामध्ये एकापाठोपाठ एक तुरा खोवला जात असून त्यांनी आणखी एका बहुमानाला गवसणी घातली आहे. Modi's India-rating सप्टेंबर महिन्यातच ‘मॉर्निंग कन्सल्ट' या अमेरिकी सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६ टक्के मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून त्यांचे सर्वोच्च स्थान कायम ठेवले होते. याआधीच्या रेटिंगमध्येही ते अग्रक्रमावर होते. ७६ टक्के लोकांनी मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिली तर १८ टक्के लोकांनी नापसंती दर्शवली.
 
 
 

Modi's India-rating 
 
 
Modi's India-rating सहा टक्के लोकांनी कोणतेही मत दिले नाही. या सर्वेक्षणात मोदींनी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अ‍ॅलेन बेर्सेट (६४ टक्के), मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (६१ टक्के) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (४१ टक्के) यांना मागे टाकले. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन पिछाडले असून त्यांना ४० टक्के, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना ३७ टक्के, युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना २७ टक्के आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना २४ टक्के मान्यता मिळाली. Modi's India-rating यशाची ही चढती कमान कायम असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युट्यूबवर २ कोटी चाहते असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंदाचे भरते आले असतानाच, त्यांना अंधभक्त म्हणून हिणवणाऱ्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. जगभरातील नेत्यांना आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बोलबाला असलेल्यांनाही यामुळे धक्का बसला आहे. यामुळे अशा प्रकारचा विक्रम करणारे ते जगातील एकमेव नेते ठरले आहेत. Modi's India-rating या युट्यूब चॅनेलवर पंतप्रधान मोदी यांच्या भाषणांचे व्हिडीओ अपलोड केले जातात तसेच त्यांच्या भाषणांचे थेट प्रक्षेपणही या चॅनेलवर मोठ्या आवडीने पाहिले जाते.
 
 
 
 
मोदी देशात किंवा जगातील कोणत्याही देशात जातात, तेव्हा त्यांचे उद्बोधन या चॅनेलवरून ऐकले जाते. मोदी तंत्रज्ञानस्नेही आहेत, हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या याच गुणांमुळे नवी पिढी त्यांच्याकडे आकर्षित झाली आहे. अनेक ठिकाणी तर आई-वडील वेगळ्या विचारांचे आणि मुले मोदींना मानणारी, असेही चित्र दिसत आहे. त्यामुळेच समाज माध्यम मंचांवर पंतप्रधान मोदी यांच्या चाहत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मोदींचे एक्स मंचावर ९.४० कोटी तर इन्स्टाग्रामवर ८.२७ कोटी फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ४.८० कोटींच्या घरात आहे. Modi's India-rating जिथे सर्वसामान्यांच्या विचारांचा कल्लोळ सुरू होतो, तिथून मोदींचे विचार पुढे धावू लागतात, असे सांगितले जाते. अनेक विषयांवर त्यांच्याजवळ केवळ सूचना आणि सल्ले नसतात तर त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची ताकदही ते बाळगतात. संघटन कौशल्य हा गुण तर त्यांच्या रक्तातच भिनला आहे. कुठलाही इव्हेंट असो त्याचा प्रचार-प्रसार कसा करावा, याची शिकवणूक मोदींकडून घेता येते. नव्या संकल्पनांची मांडणी करण्यात त्यांची हातोटी आहे. त्यामुळेच इतर नेते आधुनिक समाज माध्यमांमध्ये कुठेच त्यांच्या स्पर्धेत दिसत नाहीत.
 
 
Modi's India-rating त्यांच्या जीवनातील अगदी लहानात लहान बाबही ते समाजमाध्यमांवर पोस्ट करतात आणि त्यांना मिळणाऱ्या लाईक्सवरून त्या पोस्टची महत्ता सर्वसामान्यांसाठी किती गरजेची होती, हे कळून चुकते. देशात आणि विदेशातही होणाèया सर्वेक्षणांमध्ये ते नेहमीच अव्वल ठरलेले दिसतात. भारतातही अशी सर्वेक्षणे झाली असून सप्टेंबर २०२३ मध्ये इंडियाबसच्या पोलमध्ये त्यांची लोकप्रियता देशाच्या पश्चिम भागात सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले होते. देशातील शहरी भागात ते सर्वाधिक पसंतीचे राजकारणी असून पश्चिम, पूर्व आणि उत्तर भारतात ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशात त्यांचा वाटा सिंहाचा आहे. Modi's India-rating या राज्यांतील नेते लोकप्रियतेत पिछाडल्यामुळेच भाजपाला तेथे कोणत्याच नेत्याला मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजक्ट न करता मोदींचा चेहरा वापरावा लागला होता. यामुळे ज्या ठिकाणी भाजपाचा पराभव निश्चित मानला जात होतो, त्या राज्यातही भाजपाचे नेते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. देशाचे पंतप्रधान म्हणून काम हाताळताना नरेंद्र मोदींचे मान्यता रेटिंग तपासण्यासाठी इंडिया बसने प्रदेश, शहर, वयोगट आणि इतर गटांमध्ये पंतप्रधान मोदी किती लोकप्रिय आहेत हे शोधून काढले.
 
 
त्यानुसार त्यांना पश्चिम भारत (८० टक्के), पूर्व भारत (७३ टक्के), उत्तर भारतात (७२ टक्के) अशी उच्च रेटिंग मिळविली. तथापि, दक्षिण भारतात हे रेटिंग  ३१ टक्के होते. Modi's India-rating मोदींच्या कामाला महिलांनी सर्वोच्च रेटिंग दिले आहे. पुरुष आणि महिलांच्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचे आकडे जवळपास समान होते. रेटिंगमध्ये ६५ टक्के महिलांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले, तर ६४ टक्के पुरुषांनी त्यांना पाठींबा दिला. सर्वेक्षणानुसार, सर्व वयोगटांसाठी मोदींचे अप्रूव्हल रेटिंग स्थिर राहिले. विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेसचे युवराज बेरोजगारीचा मुद्दा लावून धरत आहेत. संसदेवर झालेला धूर हल्ला तरुणांनी बेरोजगारीच्या नैराश्यातून केल्याचा कांगावा युवराजांनी केला. पण विद्यार्थी आणि बेरोजगारांना पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे, हे वारंवार झालेल्या सर्वेक्षणातून जाहीर झाले आहे. Modi's India-rating त्यामुळे देशातील बेराजगारी वाढल्याच्या युवराजांच्या आरोपात तथ्य नसल्याचेच स्पष्ट होते. ७५ टक्के बेरोजगारांनी मोदींना पंतप्रधान म्हणून मान्यता दिली तर विद्यार्थ्यांमध्ये त्यांची मान्यता रेटिंग ६९ टक्के, नोकरदारांमध्ये ६७ टक्के आणि पूर्णवेळ पालक किंवा गृहिणींमध्ये ६३ टक्के होती. सर्वेक्षणानुसार ४७ टक्के स्वयंरोजगारांनी मोदींनी पंतप्रधान म्हणून त्यांची नोकरी हाताळण्याच्या पद्धतीला मान्यता दिली आहे.
 
 
 
विशेषतः उच्च शिक्षण असलेल्या लोकांनी मोदींना ७० टक्के उच्च रेटिंग दिले तर कमी शिक्षण असलेल्या लोकांनी ६१ टक्के रेटिंग दिले. विभिन्न क्षेत्रात लोकप्रियतेसाठी कोणत्या लांड्यालबाड्या केल्या जातात, हे आपण जाणतोच. Modi's India-rating जाहिरातींच्या क्षेत्रात तर आपापल्या प्रॉडक्टच्या लोकप्रियतेसाठी नको ते प्रकार केले जातात. या क्षेत्रातील लोकांना आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळही दिसते. इतर प्रॉडक्ट्स आपल्या वस्तूंपेक्षा किती दर्जाहीन आहेत, हे दाखवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत. मोदींनी तर स्वतःहून कुठेच स्वतःला प्रोजक्ट केले नाही. त्यांचे कामच बोलते. न थकता सातत्याने कार्यरत राहण्याची शैली भल्याभल्यांना आत्मसात करणे अशक्य आहे. मोदींनी भारतीय मतदारांवर जशी मोहिनी घातली आहे, तसाच दबदबा त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही निर्माण केला आहे. ‘वसुधैव कटुंबकम्' हा नारा त्यांच्यासाठी प्रत्यक्ष अभावग्रस्तांपर्यंत पोहोचण्याचा मंत्र आहे, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून वेळोवेळी सिद्ध केले आहे. Modi's India-rating लोकप्रियतेच्या त्यांच्या यशाबरोबरच भारताच्या जागतिक स्थितीतही सुधार होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
Powered By Sangraha 9.0