नागपूर,
Rashtrasant Tukdoji Maharaj : श्रीगुरुदेव सेवा मंडळ, शाखा अंबिकानगरच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यस्मृती महोत्सवानिमित्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. महोत्सवाची सुरुवात डॉ. माणिक शहारे, भाऊराव तायवाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाव्दारे झाली.यानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दुपारी श्रद्धांजलीचा मुख्य कार्यक्रम झाला. याप्रसंगी राष्ट्रसंतांच्या भव्य-दिव्य-विश्व व्यापक कार्याची माहिती राधेश्याम निमजे यांनी करून दिली. मुख्यत: बाळकृष्ण पाचभाई, भास्कर हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी यात्रा काढण्यात आली.
मार्गात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत Rashtrasant Tukdoji Maharaj करण्यात आले. सुरेंद्र मोकदम, श्रीराम नखाते, सत्यवान मोरे, माणिक मुळेकर आणि विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच नगरातील भक्त मंडळी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. संचालन दिलीप गाडगे यांनी केले तर निलेश मगर्दे यांनी सर्व भक्तांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर टेटे, बाळकृष्ण भोडे, गोपीचंद राऊत, चंदू सालोडकर, नत्थु थेरे, दशरथ कोठे, सुधीर टेटे, ज्ञानेश्वर बेलसरे, संगीता सालोडकर, छाया गोरे, विजया नागतुरे, मालती कुथे, अर्चना वाकेकर, मालती अमृतकर, अर्चना खवसे, ममता कापसे, अश्विनी पाथोडे आदींनी सहकार्य केले.