संस्कृती जोपासना...!

big fat Indian wedding स्त्रीवादाची पाठराखण

    दिनांक :27-Dec-2023
Total Views |
इतस्तत:
 
- डॉ. विवेक राजे
 
 
big fat Indian wedding कोणत्याही देशाला जर आपल्या सीमा सुरक्षित असायला हव्या असतील तर नेहमीच सहा आघाड्यांवर देश बलशाली असणे आवश्यक असते. पहिले म्हणजे देशाची सेना ही बलशाली, कर्तव्यदक्ष आणि आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असली पाहिजे. दुसरे म्हणजे देश आर्थिकदृष्ट्या मजबूत असला पाहिजे. big fat Indian wedding तिसरे म्हणजे देशांतर्गत सामाजिक बंधुभाव, सौहार्द आणि देशप्रेम असले पाहिजे. चौथा मुद्दा, कोणत्याही मार्गाने देशाच्या लोकसंख्येमधील धर्मीय गुणोत्तर कायम राखले गेले पाहिजे. (हा मुद्दा भारतासारख्या बहुधर्मीय निधर्मी अशा देशांकरिताच लागू होतो.) big fat Indian wedding पाचवा मुद्दा म्हणजे देशाची शिक्षण व्यवस्था स्वतंत्र आणि स्वायत्त असली पाहिजे तर सहावा मुद्दा म्हणजे देशाच्या संस्कृतीची जोपासना केली गेली पाहिजे. big fat Indian wedding इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या सहाही बाबी परस्परावलंबी असतात आणि या सहाही गोष्टींचा सुवर्ण मध्य साधत, कालानुरूप या मुद्यांचा अग्रक्रम लावतच राष्ट्राची जडणघडण होत असते. अर्थात देशाच्या नेतृत्वाला यासाठी नेहमीच जनतेपुढे एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 या सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा ...
 

big fat Indian wedding 
 
 
अत्यंत सजगपणे समाजात आणि देशात सतत होणाऱ्या बदलांचा, सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षाचा अभ्यास करून देशहिताच्या दृष्टीने त्याला दिशा देण्याचे कार्य नेतृत्वाने करणे आवश्यक असते. big fat Indian wedding देशाला वा समाजाला, राष्ट्रहिताची दिशा आणि दीक्षा देण्यात जर नेतृत्व यशस्वी झाले, तर जनतेच्या मनात देशप्रेम निर्माण होते आणि निर्माण झालेले हे देशप्रेमच मग राष्ट्रापुढील अनेक समस्यांचे सहजपणे निराकरण करते. आजच्या घडीला आपल्या देशाचे नेतृत्व पहिल्या तीन मुद्यांवर अत्यंत आक्रमकतेने काम करताना दिसते आहे. चौथ्या मुद्यावर म्हणजे लोकसंख्येशी संबंधित विषयांवर कदाचित सरकारी यंत्रणा काम करीत असतीलही; परंतु अद्याप ते दिसून येत नाही. big fat Indian wedding पाचवा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय व स्वायत्त शिक्षण व्यवस्थेचा तर त्यावरदेखील पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. सहाव्या मुद्याची म्हणजे संस्कृती जोपासण्याची जबाबदारी मात्र समाजधुरिणांवर, विचारी लोकांवरच असते, हे लक्षात घेतले पाहिजे. या देशाची संस्कृती बदलण्यासाठी वसाहतवादी मानसिकतेने किमान दीडशे वर्षांपासून प्रयत्न होताना दिसतात. यासाठी सर्वप्रथम आमची स्वयंपूर्ण अशी शिक्षण पद्धती संपवण्यात आली. मग आमच्यावर मेकॉलेप्रणीत इंग्रजी शिक्षण लादले गेले.
या सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा ... ते निजबोधे उराऊरी, भेटतु आत्मया श्रीहरी!
 
big fat Indian wedding तसेच, खरं शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षण, हेच समाजमनावर रुजवण्यात आले. सगळ्या हिंदू समाजाने पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करावे, युरोपीय जीवन प्रणाली स्वीकारत स्वत्व विसरून जावे, यासाठी प्रयत्न केले गेले. त्या पाठोपाठ आमच्या संस्कृतीवर आक्रमण केले गेले. आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षे मेहनत करून जीवनाभिमुख अशी जी हिंदू संस्कृती निर्माण केली त्याला विकृत करण्याचे प्रयत्न केले गेले. आजही हे प्रयत्न सुरूच आहेत. सर्वप्रथम हिंदू समाजाची मंदिरांशी असलेली जी जवळीक होती, ती संपवण्यात आली. big fat Indian wedding कोणत्याही संकटकाळात, समाजातील कोणत्याही घटकाला आमची मंदिरं मदतीचा हात देत असत. ‘गावांसाठी मंदिर आणि मंदिरासाठी गाव' अशी परस्परावलंबी व्यवस्था होती, हे लक्षात घेतले पाहिजे. सगळ्या मंदिरांची व्यवस्था आणि पूजाअर्चा करणारे पुजारी ब्राह्मण नसत आणि नसतात, हेही इथे नमूद केले पाहिजे. आमच्या समाजाला मंदिरापासून तोडून आमच्या आस्थेला पहिला सुरुंग लावला गेला. आज गावागावांतून मंदिरांशी आस्था असणारा वर्ग लूप्त झालेला दिसतो. हिंदू समाज आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या आधारे भक्कमपणे उभा होता. या कुटुंब व्यवस्थेला लक्ष करण्यात आले.
 
 
यासाठी अवास्तव अशा स्त्रीवादाची पाठराखण करण्यात आली. big fat Indian wedding हिंदू स्त्रीची देवतेचे स्वरूप म्हणून पूजा करतात. हिंदू धर्मातील स्त्री नेहमीच स्वतंत्र आणि आदरणीय अशीच असताना तिथेही शोषक पुरुष आणि शोषित स्त्री असे चित्र रंगविण्यात आले. त्यामुळे आमच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेली स्त्री अनेक ठिकाणी स्वतःला शोषित समजू लागली. आर्थिक स्वातंत्र्याच्या नावाखाली आमची कुटुंब आणि कुटुंब व्यवस्था कमजोर झाली. एकमेकांशी जमवून घेणे, मतभिन्नता असली तरी कर्तृत्वात कुठे अधिक-उणे असले तरीही ज्येष्ठांचा मान राखणे. सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे. नातेवाईक, आप्तस्वकीय यांच्यासहित कुटुंबाचा आणि समाजाचा गाडा ओढण्यात योगदान देणे, हे आमच्या समाजातून लोप पावताना दिसते आहे. कारण आमचा समाज आणि कुटुंब व्यक्तिस्वातंत्र्याच्या आवरणाखाली आत्यंतिक उच्छृंखल होतो आहे. big fat Indian wedding विवाह संस्कार हा आमच्या कुटुंब व्यवस्थेचा एक आधार होता. विवाह विधी आणि संस्कार त्यातील पावित्र्य आणि गंभीरता नष्ट होऊन त्याला आज एक धेडगुजरी स्वरूप येते आहे. गाण्याच्या बैठकीऐवजी ‘संगीत' या नावाखाली सत्तरी पार केलेल्या आजी-आजोबापासून पाच वर्षांच्या चिमण्या मुलांपर्यंत ‘डान्स' म्हणून ओंगळवाणे नाचणे सुरू झालेले दिसते.
 
 
आजकाल लग्नादी कार्यात स्त्रियांना साडी नेसवण्यासाठी पैसे देऊन पुरुष बोलावले जातात. साडी मुळात स्त्री वेश असताना पुरुषच कसे चांगली साडी नेसवून देऊ शकतात, हाही एक प्रश्नच आहे. अनेकदा वधू किंवा वराला विवाहस्थळी येण्यासाठी उशीर होण्याचे कारण ‘वेडिंग मेकअप'च्या नावाखाली दोघांच्याही चेहऱ्यावर चढवण्यात येणारे मेकअपचे थर असतात. big fat Indian wedding चांगलं दिसावं आणि चांगले दिसलेही पाहिजे, पण त्यासाठी होणाऱ्या यातायातीत कौटुंबिक विधी किंवा संस्कारांना तिलांजली देणे योग्य नाही, हे आपण सोयीस्कर विसरत आहोत. विवाहाकडे संस्कार म्हणून पाहण्याऐवजी आपण एक ‘इव्हेंट' म्हणून केव्हा पाहू लागलो, हे आपल्यालाच कळले नाही. याचा परिणाम म्हणजे विविध बाजारू एजन्सीजनी आमच्या विविध विधी आणि संस्काराचा आज ताबा घेतला आहे. सगळ्यांना सोयीस्कर म्हणून आपण सर्रास ‘बुफे' (स्नेहभोजनाचे) आयोजन करू लागलो आहोत. big fat Indian wedding काळाच्या ओघात ते अपरिहार्यदेखील झाले आहे. पण परिणाम म्हणजे आज घरातील स्त्रियांनादेखील जेवणाचे ताट वाढण्याची एक शास्त्रीय पद्धत होती, याची माहिती/जाण राहिलेली नाही.
 
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोजन हा एक सोहळा न राहता अश्लाघ्य श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचा आणि अनावश्यक उधळपट्टी करणारा इव्हेंट झाला आहे. आमच्या विवाह कार्यात फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर जणू या विधींचे दिग्दर्शक झाले आहेत. यांना फोटोसाठी चांगला ‘अँगल' मिळावा म्हणून विधींचे वारंवार रिटेक करायला सांगितले जात आहे आणि दुर्दैवाने या बाजारू व्यवस्थेचा भाग म्हणून विवाह संस्कार करणाऱ्या गुरुजींना/पुरोहितांना फोटोंमध्ये किंवा व्हिडीओमध्ये आपण चमकलेच पाहिजे, असं वाटू लागलं आहे. big fat Indian wedding त्यामुळे कोणत्याही विधीचे फोटो काढण्यासाठी तो विधी करणाऱ्याला सतत सूचना करताना संस्कारांच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. जग जवळ आले की संस्कृती संकर काही प्रमाणात होणार हे मान्यच करावे लागते. पण इतर धर्मीयांच्या प्रथा-परंपरांचे अनुकरण करताना योग्य-अयोग्य हा विचार होताना दिसत नाही. अनेक गोष्टी नावीन्य म्हणून, एकदाच होणार म्हणून, कुणाची तरी हौस म्हणून करताना सांस्कृतिक गाभ्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. याहूनही अधिक गंभीर बाब अशी की, या सर्व सेवा देण्यासाठी परधर्मीय लोकांना आम्ही कंत्राट देतो आहोत. ‘लग्न एकदाच होतं' या नावाखाली हे परधर्मीय लोक आमच्या विधींचे पावित्र्य घालवताना दिसतात.
 
 
big fat Indian wedding वरून हेच परधर्मीय हे इव्हेंन्ट मॅनेज करण्यासाठी आमच्याकडून भरगच्च पैसे घेऊन स्वतः गब्बर होताना दिसतात. हे सगळं आपल्या अवतीभोवती घडत असताना कुटुंबातील आईवडिलांसह सर्व वडीलधारी, सधन मंडळी डोळ्यांवर कातडे ओढून गप्प बसून आहेत. कोणीही आज्जी, आत्या, मामी, मावशी, आई ‘मी साडी नेसवून देते, ही थेरं बंद करा,' असं म्हणताना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या नावाखाली सांस्कृतिक अध:पतन, स्वैराचार qकवा उच्छृंखलपणाला विरोध होताना दिसत नाही. हाच प्रकार आमचे सणवार साजरे करताना होत असलेला दिसतो. big fat Indian wedding आमची पिढी तरुण पिढीसमोर आदर्श उभे करू शकलेली नाही, ही जाणीव अधिक व्यथित करणारी आहे. आजच्या काळात संस्कृतिरक्षण वा जोपासना ही अत्यंत महत्त्वाची, गंभीर आणि नाजूक अशी बाब झालेली आहे. युरोप आणि मध्य पूर्वेतून सातत्याने होणाऱ्या सांस्कृतिक आक्रमणाचा विरोध करणे आवश्यक आहेच; परंतु संस्कृती आणि परंपरा यांच्या नावाने आमच्या विविध संस्कार विधींमध्ये घुसवण्यात येणाऱ्या अवैज्ञानिक तसेच ख्रिश्चन व इस्लामिक प्रथा आधुनिकतेचा बुरखा घालून घुसडण्यात येतात त्याकडेदेखील सजगतेने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पूर्ण वेगात घडत असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आमची संस्कृती गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.
९८८१२४२२२४