तम निशेचा सरता...!

28 Dec 2023 19:39:15
अग्रलेख
Bharat-Amrit Kaal मावळणारा प्रत्येक दिवस नव्या दिवसासमोर काय ठेवणार आहे, हे कळले की भविष्यातील प्रत्येक क्षण आशादायक वाटू लागतो. म्हणूनच, नव्या वर्षाचे स्वागत करणे म्हणजे केवळ भिंतीवरचे कॅलेंडर बदलून नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचे पान उलटणे एवढाच उपचार नसतो. Bharat-Amrit Kaal दिवस मावळणे आणि नवा दिवस उजाडणे, हे अव्याहतपणे सुरू असलेले चक्रच असते. तरीही, सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस मावळणार या विचाराने जशी मनाची हुरहूर होते, तसे नव्या दिवसाच्या स्वागताचे वेधही लागून राहतात. Bharat-Amrit Kaal खरे तर, सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस त्या वर्षातील किंवा कोणत्याही अन्य दिवसांहून काही वेगळा नसतो. त्या दिवशीही नेहमीसारखाच सकाळी सूर्य उगवतो, त्याला पाठीवर घेऊन जग आपल्या रहाटीनुसार धावत राहाते आणि संध्याकाळी सूर्य मावळतीकडे निघाला की पाठीवरचे दिवसाचे ओझे उतरवून माणूस काहीसा निवांत होतो. Bharat-Amrit Kaal नव्या दिवसाला सामोरे जाण्याची ऊर्जा म्हणून मावळत्या दिवसाने आपल्याला काय दिले, आपण काय कमावले किंवा काय गमावले याचा लेखाजोखा मांडला जातो.
 
कालचा अग्रलेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा ...
मोदींचे आणखी एक यशोशिखर !
 
 

Bharat-Amrit Kaal 
 
 
दिवसभराच्या प्रत्येक मिनिटागणिक पडणारे आपले प्रत्येक पाऊल त्याची नोंद घेऊन ती मेंदूकडे पाठवतच असते. हे काम अधिक सोपे व्हावे म्हणून, पुढे चाललेल्या काळासोबत चालताना, मागे पडलेल्या प्रत्येक क्षणाची साठवण करणारा एक कप्पा माणसाच्या मनात तयार झालेला असतो. मन हा काही दृश्य अवयव नाही, तो दाखविता येत नाही, तरीही त्याचे अस्तित्व नाकारतादेखील येत नाही. Bharat-Amrit Kaal मनाच्या या कप्प्यात आठवणींची प्रचंड साठवण होते, तेव्हा त्या इतरांसोबत वाटून घेतल्याने मन मोकळे होते, असे म्हणतात. कदाचित, मन मोकळे करण्याचा वार्षिकोपचार म्हणूनच, दिवस मावळताना त्यामध्ये साठलेल्या आठवणींची देवाणघेवाण करण्याची प्रथा पडली असावी. असे केल्याने मनाच्या कप्प्यातील जागा नव्या आठवणी साठविण्यासाठी मोकळी होते आणि ज्याच्यासोबत या आठवणींची देवाणघेवाण होते, त्याच्या मनात नव्या आठवणींच्या साठवणी जपल्या जातात. असे जर प्रत्येक दिवसागणिक, कळत, नकळत होत असेल, तर वर्षअखेरच्या किंवा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचे वेगळेपण आपण मान्यच केलेले असल्याने, त्या दोन दिवसांतील आठवणी या कप्प्यात साठविणे हे रीतीनुसारच ठरते. Bharat-Amrit Kaal म्हणूनच, सरत्या वर्षाचा मागोवा घेण्याची आणि नव्या वर्षाकरिता स्वप्नांची बांधणी करण्याची प्रथा जगभर पडली असावी. कारण, मन नावाच्या या अदृश्य अवयवाला भौगोलिक सीमांचेही बंधन नसते.
 
आमचे अग्रलेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा ...
कापसाची शेती आणि समृद्धी  
 
जगाच्या पाठीवर माणूस म्हणून वावरणाऱ्या प्रत्येक प्राण्यास त्याचे त्याचे मन असते आणि त्या मनाची वर्तणूक सर्वत्र समानच असते. कदाचित त्याच्याशी संवादाची भाषा वेगवेगळी असली, मनाने मनाशी संवाद साधण्याची त्याची भाषा जरी स्वतंत्र असली, तरी विचारांची दिशा एकच असते. त्यामुळे वर्षअखेरच्या दिवशी संवाद साधताना प्रत्येक माणूस आपल्या आपल्या जगाच्या भाषेतदेखील त्याच्या सरत्या वर्षातील आठवणींचा लेखाजोखा मांडतोच. Bharat-Amrit Kaal तो उत्साहवर्धक असला, की नव्या वर्षाच्या प्रत्येक दिवसाचा आनंद उपभोगण्याची ऊर्जा मनात साठत जाते आणि तो निराशाजनक असला, तर नवे वर्ष कितीही आनंदाची स्वप्ने दाखविण्याच्या तयारीने येत असले, तरी त्याच्या स्वागताचा सोहळा साजरा होतच नाही. याच परंपरेचा भाग म्हणून आज भारतातही नव्या वर्षाच्या स्वागताचीच तयारी सुरू झाली आहे. भूतकाळाकडे जाणारा प्रत्येक क्षण हा भविष्यासोबत समोर येणारा प्रत्येक नवा क्षण जगण्याची ऊर्जा देत असतो, असे म्हणतात. असे जर असेल, तर मावळत्या वर्षाचा लेखाजोखा मांडताना आपल्याला मिळालेली ऊर्जा अक्षय्य आहे, असे म्हणता येईल. Bharat-Amrit Kaal कारण, गेल्या वर्षभरात भारताने अनेक क्षेत्रांत घेतलेल्या उत्तुंग भराऱ्या आपण सर्वांनी सामूहिकपणे अनुभवलेल्याच आहेत. या केवळ कागदावरच्या भराऱ्या नाहीत, तर प्रत्येक भरारीसोबत भविष्याचे आश्वस्त चित्र आपण अनुभवलेले आहेत.
आमचे अग्रलेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा ...
 आत्मनिर्भरता नावडे आघाडीला !
 
 
या काळात काही क्षण कदाचित कोमेजलेलेही होते, पण त्यामुळे मनावर दाटणारी काळजीची काजळी पुसून नवी उमेद जागविण्याच्या क्षमता असलेल्या नव्या क्षणांनी त्यावर वेळोवेळी मातदेखील केली आहे. या प्रवासात कधी शोकाचे सावटही दाटले, तर कधी मन अभिमानाने भरून गेले, छाती फुलून आली आणि भविष्याच्या स्वप्नांचे रस्तेदेखील अधिक रुंदावले. Bharat-Amrit Kaal प्रत्येक क्षण केवळ आनंदाचे फुलोरे हाती घेऊनच व्यक्तीसमोर येतो असे नाही. कधी एखाद्या क्षणाला दुःखाची किनारदेखील असते. पण दुःख कुरवाळायला आसवांना वेळदेखील मिळू नये अशा वेगाने सुखाचे क्षण समोर येऊन उभे राहतात आणि नव्या क्षणाला सामोरे जाण्याची नवी उमेद भविष्यातील अपेक्षांच्या कक्षा रुंदावत राहते. आमचे अग्रलेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा ... या गांधींचे करायचे काय ? म्हणूनच, आनंदाचे क्षण अनुभवावेत, ते वाटून घ्यावेत आणि आनंदाच्या अनुभवांची साठवण एकमेकांसोबत वाटण्यासाठीच मन मोकळे करावे यातच खरे समाधान असते. सध्या भारताचा खऱ्या अर्थाने अमृतकाळ सुरू आहे. आणखी पंचवीस वर्षांच्या पुढच्या वाटचालीची पायाभरणी करण्याचा मुहूर्त म्हणून आपण सरत्या वर्षाची निवड केली. Bharat-Amrit Kaal त्यामुळे साहजिकच, पुढच्या वाटचालीसाठी उत्साह आणि ऊर्जा पुरविणारे वर्ष म्हणूनच सरत्या वर्षाचे वर्णन करावे लागेल. या वर्षात देशाच्या संसदेला नवी, भव्य अशी, नवता आणि परंपरांचा अनोखा संगम साधणारी वास्तू लाभली आणि देशाच्या लोकशाहीचा सन्मान झाला. अभिमानाच्या या आगळ्या अनुभवात देशभरातील क्रीडापटूंनी भर घातली.
 
 
Bharat-Amrit Kaal जागतिक स्तरावरील वेगवेगळ्या क्रीडास्पर्धांमध्ये भारताच्या महान क्रीडापटूंनी केलेली चमकदार कामगिरी हा सरत्या वर्षाने देशाला दिलेला नजराणा ठरला आहे, तर आजवर कोणत्याही देशाने केले नव्हते, ते चंद्रभूमीच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तेथे तिरंगा फडकावण्याचे अफाट धाडस दाखवून भारतीय अंतरिक्ष विज्ञानाने जगाला अचंबित केले आहे. जी-२० सारख्या जागतिक प्रतिष्ठेच्या परिषदेचे यशस्वी आयोजन एवढीच भारताची जमेची बाजू नाही, तर या परिषदेच्या यजमानपदाचा मान मिरविताना, देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संस्कारांची जगाला ओळख करून देण्याची संधी भारतासमोर चालून आली, हा सुवर्णयोग म्हणावा लागेल. Bharat-Amrit Kaal ‘वसुधैव कुटुम्बकम्' ही भारताची सांस्कृतिक शिकवण आहे आणि त्या विचारांनुसार आचरण केले तरच जग परस्परांच्या सहकार्याने मानवी प्रगतीचे पुढचे टप्पे गाठू शकणार आहे, हा संदेश या परिषदेमुळेच जगाने स्वीकारल्याचे सिद्ध झाले आहे. आमचे अग्रलेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा ... गोंधळी खासदारांच्या निलंबनाची कारवाई योग्यच ! दहशतवाद, भ्रष्टाचार, कुटुंबकेंद्रित राजकारण, अशा अनेक समस्यांचा विळखा देशाला पडलेलाच आहे. या विळख्याच्या कचाट्यातून देशाला सोडविण्यासाठी केवळ सरकारे पुरेशी ठरत नाहीत. त्यासाठी समाजाचे सहकार्य आवश्यक असते. सरत्या वर्षात सरकारने यासाठी एक पाऊल पुढे टाकले आणि समाज आश्वस्तपणे सरकारसोबत सरसावला, हीदेखील सरत्या वर्षाची मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. Bharat-Amrit Kaal म्हणूनच, मावळते वर्ष हा भारताच्या वाटचालीतील ऐतिहासिक काळ म्हणावा लागेल. भारताची प्रचंड लोकसंख्या ही समस्या नसून भविष्यातील संधी प्राप्त करण्याची क्षमता असलेली शक्ती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मानतात.
 
 
या वर्षात लोकसंख्येच्या या आकड्याने चीनला मागे टाकले आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ताठ मानेने मिरविण्याची संधीही दिली. आणखी तीन दशके तरी, लोकसंख्येचा हा आलेख भारताच्या श्रमशक्तीचा मानबिंदू म्हणून मिरविणार असल्याचे स्पष्ट झाल्याने, लोकसंख्येची लाज वाटण्याचे जुने दिवस मागे पडले, हा संदेशही सरत्या वर्षाने समाजाला दिला. Bharat-Amrit Kaal वाढत्या लोकसंख्येसोबत नागरी सुविधांची आणि पायाभूत सुविधांची गरजही वाढत असते. २०१४ मध्ये देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या ताफ्यात केवळ ४०० विमाने होती, आज ती संख्या साडेसहाशेच्या घरात गेली आहे. आमचे अग्रलेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा ... गॅरंटी विरुद्ध वॉरंटी ! सरत्या वर्षात डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्याअखेरपर्यंत प्रत्यक्ष करसंकलनाचा आकडा १३ लाख ७० हजार ३८८ कोटींच्या घरात पोहोचला होता. त्याआधीच्या वर्षातील करसंकलनापेक्षा हा आकडा २०.६६ टक्क्यांनी अधिक आहे, एवढी एकच बाब, देश आर्थिक स्थैर्याच्या मार्गाने समाधानी वाटचाल करत असल्याचे सूचित करण्यास पुरेशी आहे. Bharat-Amrit Kaal कोविडच्या संकटानंतर पसरलेल्या अस्थैर्याच्या सावटातून जगातील अनेक देश अद्याप बाहेर पडलेले नसताना आपण उद्याची उज्ज्वल स्वप्ने मोठ्या उमेदीने पाहात आहोत, एवढी एकच बाब नव्या वर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यासाठी पुरेशी नाही काय?
Powered By Sangraha 9.0