कोंढाळा येथे ‘पुजित मंगल अक्षता कलश’ ची स्थापना

28 Dec 2023 19:33:17
देसाईगंज, 
Pujit Mangal Akshata Kalash : तालुक्यातील कोंढाळा गावामध्ये बुधवार, 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास अयोध्यावरून प्रभू श्रीराम यांच्या पुजित मंगल अक्षता कलशचे आगमन झाले. त्यानुसार गावामध्ये पुजित मंगल कलश शोभायात्रेचे आयोजन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या पुजित अक्षता कलश समिती कोंढाळाच्यावतीने करण्यात आले होते.
 
Pujit Mangal Akshata Kalash
 
हिंदू-सनातन समाजाच्या गौरवान्वित ऐतिहासिक दिनाला देशभरात गांवोगांवी तसेच घरो-घरी दिवाळीसारखा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असून प्रभू श्रीराम यांच्या Pujit Mangal Akshata Kalash पुजित मंगल अक्षता 22 जानेवारी 2024 रोजी घरोघरी वाटप करण्यात येणार आहेत. पुजित मंगल कलश शोभायात्रा सर्वप्रथम बस स्थानक परिसरापासून ते गावातील हनुमान मंदिर- इंदिरा नगर, नवनगर टोली समाज हनुमान मंदिर-दुर्गा मंदिर, जुना देऊळ हनुमान मंदिर, नवीन देऊळ हनुमान मंदिर, आझाद चौक, माराई माता मंदिर या ठिकाणी काढून शेवटी ’पुजित मंगल अक्षता कलश’ ची स्थापना दत्त मंदिर कोंढाळा येथे करण्यात आली.
 
 
पुजित मंगल कलश शोभायात्रेमध्ये गावातील आबालवृद्ध, पुरुष-महिला मंडळी, युवक-युवती तसेच भाविक-भक्त गण मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रभू श्रीराम नामाचा जयघोष करीत संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’ च्या गजराने गुंजित होता.
Powered By Sangraha 9.0