प्रभू पार्श्वनाथची तरंगणारी मूर्ती यवतमाळात

    दिनांक :28-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Lord Parshvanatha : जमिनीत किंवा विहिरीत जैन तीर्थंकरांच्या मूर्ती सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु समुद्रात जैन मूर्ती सापडल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. मदुराईच्या समुद्रतटावर खोल पाण्यातून शंख काढण्यार्‍या गोताखोरांना खाली मातीत रुतलेली एक दगडी मूर्ती दिसली.
 
Lord Parshvanatha
 
ही मूर्ती वर आणण्याच्या प्रयत्नात मूर्ती पाण्यावर तरंगू लागली. अनेक हातांतून मग ही मूर्ती सुरतमधील Lord Parshvanatha  जैन आचांर्य भगवंत सागरचंद्रसागर सुरीश्वर यांच्याकडे पोहचली. प्राकृतिक स्वरूपात मिळालेली ही मूर्ती जैनांचे 23 वे तीर्थंकर प्रभू पार्श्वनाथ यांची असल्याचे निदान झाले. पुरातत्त्व विभागानुसार दगडाचे रूपांतर कोरल स्टोनमध्ये होण्यासाठी एक हजार वर्षे लागतात. ही मूर्ती प्राकृतिक स्वरूपात असून ती अंदाजे 1500 वर्षे जुनी असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. यी मूर्तीच्या दर्शनाकरिता लोकांनी एकच गर्दी केशरिया भवनात केली.
 
 
ही Lord Parshvanatha  दगडाची मूर्ती विश्वातील पाण्यात तरंगणारी प्रथम मूर्ती असल्यामुळे तरता पार्श्वनाथ प्रभू असे तिचे नामांकन करण्यात आले आहे. सध्या पार्श्वनाथ प्रभूंचे 2800 वे निर्वाण वर्ष सुरू असून ही मूर्ती मुंबई-गोवा मार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव तहसीलमधील पार्श्वपूरम जैन तीर्थामध्ये स्थापित करण्याचा निर्णय, विश्व जैन परिषद व श्री पार्श्व निर्वाण वर्ष उत्सव समिती, मुंबई यांनी घेतला आहे. भारताच्या विविध जैन तीर्थस्थानांत, शहरांत ही मूर्ती एका रथात बसवून दर्शनासाठी पदक‘मण करीत यवतमाळ लकडगंज जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ व केसरिया भवनात पोहचली. मंदिराचे अध्यक्ष सुभाष जैन, ट्रस्टी उदय धरमसी, सचिन कोठारी, दिलीप लोढा, वीरेंद्र मुथा, राजू खिवसरा यांनी या रथाचे स्वागत केले.
 
 
या Lord Parshvanatha  मूर्तीची लब्धी कोठारी, सरिता भन्साली, कीर्ती मुथा, साधना जैन, लीला लोढ़ा, सपना मुथा, ऊर्मी धरमसी, नीलिमा लोढा, रंजना खिवसरा, संगीता लोडाया, सेजल दोषी, अंकिता कोचर, अल्पा दोषी, कुसुम दफ्तरी, मुस्कान बंब, मीनू बोरा, अदिती बंब, शरयु दोषींसह अनेक जैन श्रावकांनी या मूर्तीची विधिवत पूजा केली.