‘नागपूर की कहानी कला की जुबानी’

-‘जालियनवालाबाग हत्याकांड’चे सादरीकरण
-‘अतित के रंग कला के संग’

    दिनांक :28-Dec-2023
Total Views |
नागपूर, 
Nagpur Ki Kahani : भारतीय विद्या भवन्स बंगलुरू केंद्र, इन्फोसिस फाऊंडेशन बंगलुरू यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाईन्समधील भारतीय विद्या भवन्स सभागृहात आयोजित ‘अतित के रंग कला के संग’मध्ये ‘नागपूर की कहानी कला की जुबानी’ या नृत्य नाटिकेतून नागपूरचा इतिहास जिवंत साकारला गेला. लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र व गुजरात उपक्षेत्राचे जीओसी मेजर जनरल संजयकुमार विद्यार्थी प्रमुख पाहुणे होते. त्यांचा राजेंद्र पुरोहित यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
 
Nagpur Ki Kahani
 
संजयकुमार विद्यार्थी यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संस्कृती स्वीकारूनच विकास साधता येत असल्याचे सांगत भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिरच्या प्रगती व गुणवत्तेचे कौतुक केले. Nagpur Ki Kahani भवन्स बी. पी. विद्या मंदिर श्रीकृष्णनगर शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘नागपूर की कहानी कला की जुबानी’ या नृत्य नाटिकेतून नागपूरचा इतिहास जिवंत केला. ‘जालियनवालाबाग हत्याकांड’ हे दमदार, प्रभावी आणि परिणामकारक नाट्य सादरीकरण झाले.
 
 
अमेय जाधव लिखित व संजय भाकरे दिग्दर्शित ‘जालियानवाला बाग हत्याकांड’ नाटक सादर झाले. सूत्रधार शेखर मंगलमूर्ती, निर्मिती अनिता भाकरे, संगीत अभिषेक बेल्लरवार, प्रकाश व्यवस्था वृषभ धापोडकर, नेपथ्य नितेश गाडगे, वेशभूषा जुई गडकरी, निर्मिती सहाय्यसागर देशपांडे, सुयश गोखले, दिव्या विंचूरकर, सूमित बावणे यांचे होते. Nagpur Ki Kahani सचिन गिरी, आदित्य गुलगुले, संकल्प पायल, मधुरा शिलेदार व धृवी शहा यांच्या अभिनयाने अवघे सभागृह भारावून गेले. दोन्ही कार्यक्रमाचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. संचालन निधी पुरोहित व अश्विनी देहाडराय यांनी केले.