Ayodhya अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य मंदिरात २२ जानेवारीला रामललाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा होत असताना उत्तरप्रदेशातील योगी आणि केंद्रातील मोदी सरकारने Ayodhya अयोध्येचा पूर्ण कायापालट केला. आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित करताना अयोध्येत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आणि रेल्वेस्थानक उभारण्यात आले. विमानतळ, रेल्वेस्थानकासह अन्य सुविधांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबरला समारंभपूर्वक होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.
Ayodhya अयोध्येत रेल्वेस्थानक आधीपासूनच होते. त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. विमानतळ प्रथमच उभारण्यात आले. अयोध्येत याआधी फक्त धावपट्टी होती. या विमानतळाला श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. भगवान श्रीरामाच्या नावाला साजेसा असा मंदिराचा आकार या विमानतळाला देण्यात आला आहे. नागर शैलीत करण्यात आलेल्या या विमानतळाच्या बांधकामाला अडीचशे कोटी रुपये खर्च आला आहे. विमानतळाच्या भिंतीवर रामायणाशी संबंधित चित्र रेखाटण्यात आले आहेत. Ayodhya जुन्या फैजाबादमधील अवध विद्यापीठाजवळ उभारण्यात आलेल्या विमानतळाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार असून, यासाठी आवश्यक ८२१ एकर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम पूर्ण झाले असून, पहिल्या टप्प्यातील एका धावपट्टीचेही काम पूर्ण झाले आहे. २,२०० मीटर लांब आणि ४५ मीटर रुंद अशी ही धावपट्टी आहे. भविष्यात ही धावपट्टी ३,७५० मीटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे. या विमानतळावर रात्रीच्या वेळी तसेच धुक्याच्या परिस्थितीत विमान उतरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे (एटीसी) कामही पूर्ण झाले आहे.
रेल्वेस्थानकालाही विमानतळाचा लुक
आतापर्यंत Ayodhya अयोध्या जंक्शन म्हणून ओळखले रेल्वेस्थानक आता अयोध्या धाम रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. अयोध्येतील जुन्या रेल्वेस्थानकाला देशातील सर्वांत आकर्षक आणि अत्याधूनिक असे रूप देण्यात आले आहे. रेल्वेस्थानकाचा बाहेरचा लुक पाहून आपण रेल्वेस्थानकावर नाही तर विमानतळावर आल्याचा भास होतो. विमानतळावर मिळतात तशाच सुविधा या रेल्वेस्थानकावर प्रवाशांना मिळणार आहेत. देशातील कोणत्याच रेल्वेस्थानकावर मिळत नाही, अशा सुविधा अयोध्या धाम रेल्वेस्थानकावर प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. शिशुंसाठी विशेष सुविधा या रेल्वेस्थानकावर आहेत. मोठ्या लोकांसाठी वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून, शिशु आणि लहान मुलांसाठी वेगळा वैद्यकीय कक्षही स्थानकावर राहणार आहे. Ayodhya तळमजल्यावर प्रतीक्षालय, वातानुकूलित प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, फूड प्लाझा, क्लॉक रुम, पर्यटन माहिती केंद्र आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट आणि एस्केलेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर लावण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर रिटायरिंग रुम, एसी रिटायरिंग रुम, लेडीज आणि जेंटस डार्मिटरी आदीची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या मजल्यावर कॉनकार्सही आहे.