तभा वृत्तसेवा
आर्णी,
Arni Taluka बुधवार, 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आर्णी तहसील कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकार्यांचा बैठकीत आढावा घेऊन त्यांना दिशानिर्देश दिले. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता नगर परिषदेच्या उमरी इजारा रस्त्यावरील डम्पिंग ग्राऊंडचा आढावा घेत त्यांनी मु‘याधिकार्यांना निर्देश दिले.
जिल्हाधिकारी आशिया यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन विविध विभागांच्या समस्या तथा कार्याचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या. इतर विभागांच्या अधिकार्यांनाही बोलावून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले. विकास कामे व समस्यांची माहिती घेतली. Arni Taluka यावेळी त्यांनी तहसीलदार परशराम भोसले, निवासी नायब तहसीलदार तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी उदय तुंडलवार, सार्वजनिक बांधकाम अधिकारी घोडेराव, प्रमोद पांडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, तालुका कृषी अधिकारी आनंद बदखळ, विद्युत विभागाचे अभियंता राऊत, आर्णी वनपरिक्षेत्र अधिकारी वानखडे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवन जाधव, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण आडे व इतर विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून माहिती घेतली. यावेळी नप आरोग्य कर्मचारी संदीप खंदार, अस्लम शहा व इतर कर्मचारी उपस्थित होते. या दौर्यात यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी हेही त्यांच्यासोबत होते.