बुलढाणा,
Akshata Kalash Procession : अयोध्या येथे भव्य दिव्य श्रीराम मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना ऐतिहासिक समारंभ संपन्न होत आहे. या ऐतिहासिक समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी संपूर्ण देशभर अयोध्या येथुन पवित्र पूजीत अक्षता कलशाचे आगमन झाले आहे. बुलढाणा शहरातील विविध भागात शोभायात्रा काढण्यात येत आहेत. दि. 28 डिसेंबर गुरुवार ला सकाळी 9 ते 11 या कालावधीत चैतन्यवाडी स्थित श्री. मारोती मंदिर ते श्री.गजानन महाराज मंदिर ( विष्णु वाडी ) अशी सुंदर सजावट केलेल्या रथावर श्रीराम मंदिर अयोध्या पूजित Akshata Kalash Procession अक्षता कलश प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेसह शोभायात्रा मंगलमय उत्साहात संपन्न झाली
यावेळी सार्वजनिक आयोजन समिती चे कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनी श्रीराम मंदिर अयोध्या पूजित Akshata Kalash Procession अक्षता कलशाचे पूजन पुष्पहार अर्पण करून केले. याप्रसंगी बुलढाणा नगरसहसंघचालक महेश पेंडके संस्कृत भारती बुलढाणा विभाग संयोजक प्रा. विजय जोशी, श्रीसंत गजानन महाराज मंदिराचे जेष्ठ कार्यकर्ते मेहुनकर काका श्रीमती आरास, रविंद्र गणेशे, उल्हास पाठक, अमित कुळकर्णी, राजहंस सुहास ठोके, गजानन व्यवहारे मोहनमामा केसाळे आदिंनी पूजन करून शुभारंभ झाला.
उपस्थित सर्वश्री संदेश सपकाळ दिपक जोशी बाबासाहेब वरणगांवकर श्रीकांत टेंभीकर मीना कुळकर्णी सुलभा विजय जोशी राजहंस सुरभी पांडे, चेकेटकर, उपस्थित सर्वंच श्रीराम भक्तांनी श्रध्दापूर्वक पूजन केले. शोभायात्रा प्रारंभ झाली. या शोभायात्रेचे उत्स्फूर्तपणे नागरिक बंधु आणि भगिनींनी मोठमोठ्या सुंदर रांगोळ्या काढून आणि श्रीराम मंदिर अयोध्या पूजित Akshata Kalash Procession अक्षता कलशाचे ओवाळून पूजन केले. शोभा यात्रा श्रीसंत गजानन महाराज मंदिर चौकात पोहचल्यावर मंदिराच्या विश्वस्तांनी फटाके आणि मंगल वाद्ये वाजवून शोभायात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. याच ठिकाणी शोभायात्रा समाप्त झाली. नागरीकांच्या दर्शनासाठी आज आणी उद्या पर्यंत श्रीराम मंदिर अयोध्या पूजित अक्षता कलश श्रीगजानन महाराज मंदिरात राहणार आहे. सर्वांनीच दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आयोजन समितीने केलें आहे.