मालेगाव,
Saint Narahari Sonar temple : शहरातील भाविकांच्या पुढाकारातून उभारल्या जात असलेल्या सर्व सोनार समाजाचे आराध्य दैवत तथा वारकरी संप्रदायाचे मुकुटमणी श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांचे भव्य असे मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सदर काम लवकरच पूर्ण होऊन महाराष्ट्रातील हे सर्वात भव्य असे पहिले मंदिर संत श्री नरहरी सोनार मंदिर दर्शनासाठी सर्वांकरीता खुले होणार असल्याने सर्व सुवर्णकार समाजबांधवांसह भाविकामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शहरातील जुना कुरळा मार्गावरील Saint Narahari Sonar temple श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांचे मंदिर बांधकामाचे भुमिपूजन ८ सप्टेंबर रोजी पुजारी वेदशास्त्री शशिकांत देव महाराज यांच्या पौरोहीत्या खाली करण्यात आले होते. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून शिरपूर जैन येथील श्री जानगीर महाराज संस्थानचे महंत महेशगिर बाबा, येवता येथील श्री सिद्धेश्वर संस्थानचे शांतीपुरी बाबा, संजय बाबा पाचपोर आदी साधु मंहताच्या उपस्थितीमध्ये विधिवत अभिषेक, पूजा, अर्चा आरती, महापूजा करून करण्यात आले होते. अवघ तीन महिन्याच्या कालावधीत शहरातील संत श्री नरहरी सोनार महाराज मंदिराचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे. या मंदिरात श्री गणपती, श्री विठ्ठल रुमिणी, संत श्री नरहरी सोनार तसेच शिवलिंग -पिंड व त्यासमोर वाहन नंदी यांची सुंदर आकर्षक मूर्तीची विधिवत महंत, मान्यवरांचे उपस्थितीत लवकरच प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
राज्यातील मालेगाव शहरात हे पहिले भव्य मंदिर उभे राहत असून, शहरातील सर्व सोनार समाज बांधवांच्या सहभागातून संत श्री नरहरी सोनार महाराज यांचे मंदिर बांधकाम पूर्णत्वास येत असल्याने सर्व सोनार समाज बांधवांसह भाविकामध्ये मोठ्या उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरासह पंचक्रोशितील भक्तगणासाठी Saint Narahari Sonar temple श्री संत नरहरी सोनार महाराज यांचे मंदिर लवकरच दर्शनासाठी खुले होणार आहे.