- तेलंगणातील निर्मलमध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचंड विजय
उमरखेड,
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने तेलंगणातील विधानसभेसाठी महाराष्ट्रातील आमदार प्रभारी म्हणून पाठविले होते. त्यामध्ये उमरखेडचे MLA Namdev Sasane आमदार नामदेव ससाने यांना निर्मल मतदारसंघ प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आ. ससाने यांनी निर्मल विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरून प्रचार केला होता.
त्याला यश मिळून भाजपाचे उमेदवार अलेटी माहेश्वर रेड्डी यांनी 51 हजार मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. केसीआर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले अलोला इंद्रकरण रेड्डी यांना पराभूत करत दणदणीत मताधिक्य मिळविले. आमदार नामदेव ससाने यांचे संघटनकौशल्य निर्मल येथे विजयासाठी योगदान ठरले. विशेष म्हणजे या मतदारसंघात विजयी उमेदवाराच्या विरोधात पक्षातील काही कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवत राजीनामे दिले होते. त्याच ठिकाणी MLA Namdev Sasane आ. नामदेव ससाने यांनी संघटन कौशल्य दाखवत तेलंगणातील निर्मल विधानसभेचा उमेदवार 51 हजारांच्या मताधिक्याने निवडून आणण्यात हातभार लावला.