राखी यांचे पुनरागमन

03 Dec 2023 23:17:11
मुंबई :
हिंदी, बंगाली चित्रपटांतील दिग्गज अभिनेत्री Rakhi's comeback राखी गुलजार पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिवशी जन्मलेल्या Rakhi's comeback राखी सध्या ७६ वर्षांच्या आहेत. चित्रपट सूत्रानुसार, ‘अमर बॉस' या बंगाली चित्रपटाद्वारे राखी पुनरागमन करणार असून, तब्बल २० वर्षांनंतर त्यांचा अभिनय पाहता येईल.
 
 
rakhi
 
Rakhi's comeback नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी या लोकप्रिय कलाकारांचीही त्यात भूमिका आहे. दिग्दर्शक ऋतुपर्णाे घोष यांचा ‘शुभो मुहूर्त' हा बंगाली चित्रपट उद्योगक्षेत्रातील शेवटचा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. तर, २०१९ मधील निर्बाणनंतर त्यांनी कोणतीही भूमिका साकारलेली नाही. Rakhi's comeback  राखी यांनी आपल्या चार दशकांच्या अभिनय कारकीर्दीत १०० हून अधिक चित्रपटांत काम केले. जीवनमृत्यू, आँखों आँखों में, २७ डाऊन, तपस्या, कभी-कभी, दुसरा आदमी, तृष्णा, मुकद्दर का सिकंदर, शक्ती, राम लखन, बाजीगर, करण अर्जुन, बॉर्डर अशी काही त्यांच्या अभिनयकृतींची यादी आहे. दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तीन फिल्मफेअरसह अन्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. भारत सरकारच्या वतीने २००३ साली पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0