अजिंठाची-वेरूळची लेणी

    दिनांक :03-Dec-2023
Total Views |
ajintha-verul छत्रपती संभाजी नगर शहरापासून ३० कि.मी. अंतरावर वेरूळ गावात जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्याआहेत.एकूण ३४ लेणी आहेत.यात १२ बौद्ध (लेणे क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली.कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (७५७-७८३) मध्ये बांधण्यात आले होते.संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे, ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे.एकूणच २७६ फूट लांब, १५४ फूट रुंद, हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे ४० हजार टन दगड काढला गेला.
 
 
ajintha verul
 
इतिहास
पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम)यांच्या काळात झालेली आहे.या लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे.१९व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले.ajintha-verul तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६० च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.
रचना
भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यांत खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे.या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र. ११ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ची गुंफा जैन धर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.